शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

भवभूती शिक्षण संस्थेला समाजभूषण पुरस्कार

By admin | Updated: May 14, 2015 00:43 IST

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे सन २०१४-१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण ...

आमगाव : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे सन २०१४-१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालयासमोर मुंबई येथे भवभूती शिक्षण संस्थेला देण्यात आला.पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडाले, दिलीप कांबळे, स्नेहल आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. बाबासाहेब समाज भुषण पुरस्कार सन २०१४-१५ साठी १० सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच ५१ व्यक्तिंना हा पुरस्कार व रोख देऊन सन्मानित करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील भवभूती शिक्षण संस्था आमगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, राजकुमार बडोले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रूपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेतर्फे केशवराव मानकर, सुरेश असाटी व डॉ.डी.के. संघी यांनी हा पुरस्कार स्विकारला.भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खा. स्व. लक्ष्मणराव मानकर यांनी दुरदृष्टीकोन ठेऊन ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात १९५२ मध्ये केली. ग्रामीण भागातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी चोपा आणि कुऱ्हाडी येथे १९६० मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर १९६४ मध्ये भवभूती महाविद्यालय सुरु केले. कला, वाणिज्य व विज्ञानाचे शिक्षण दिले जाते. सध्या तिथे पदव्यूत्तर पदवी व संशोधन विभागही सुरु आहे.भवभूती शिक्षण संस्थेंतर्गत मानकर ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट यामध्ये सर्वप्रथम १९८७ मध्ये तत्कालिन भंडारा जिल्ह्यामध्ये पहिले औषधी निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. त्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र केशवराव मानकर यांनी सुद्धा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत शिक्षण सेवेचे व्रत अविरत सुरु ठेवले. या संस्थेने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. संस्थेने पुढे २००५ मध्ये बि.एड. २००६ मध्ये डीटीएड २००९ मध्ये पॉलिटेक्निक कॉलेज व २०१४ मध्ये आयटीआय अशा विविध अभ्यासक्रमाची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन दिली. या शैक्षणिक सुविधेचा फायदा आमगाव, गोंदिया क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता विदर्भासह मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांनाही होत आहे.विविध विद्याशाखांच्या माध्यमातून संस्थेने जी नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळेच या संस्थेचे नाव विदर्भातील अग्रगण्य संस्थेत गणल्या जाते. (शहर प्रतिनिधी)