शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून ?

By admin | Updated: September 26, 2016 01:51 IST

विकासकामे कोणत्याही निधीतून होवो, मात्र शेवटी पैसा हा शासनाचाच असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे

बिजेपार : विकासकामे कोणत्याही निधीतून होवो, मात्र शेवटी पैसा हा शासनाचाच असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे भूमिपूजन असो किंवा लोकार्पण, त्यात लोकप्रतिनिधींना पाचारण करणे हा प्रोटोकॉल असतो. मात्र नक्षल फंडातून डोमाटोला येथे तयार समाजभवनाच्या लोकार्पण सोहळ्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रोटोकॉलचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून? असा सवाल उपस्थित झाला आहे.नक्षल निधीतून अनेक विकास कामांसाठी व जनतेकरिता सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून अनेक बाबींसाठी शासनाच्या तिजोरीतून निधी दिला जातो. जरी नक्षल निधीमार्फत हे विकास काम होत असले तरी शेवटी शासनाचा पैसा असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे भूमिपूजन असो किंवा लोकार्पण सोहळा असो, त्यामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना पाचारण करणे हा प्रोटोकॉल समजला जातो. परंतु ग्रामपंचायत पांढरवाणी अंतर्गत डोमाटोला या गावी मागील वर्षी नक्षल निर्मूलन निधीतून दहा लाख रूपयांच्या खर्चातून समाजभवन बांधण्यात आले. त्याचा रविवारी (दि.२५) ला लोकार्पण सोहळा पार पडला. त्याकरिता निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मंडल पांढरवाणी द्वारे कार्यक्रम पत्रिका काढण्यात आली. यावर पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे व जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे यांंनी नाराजी व्यक्त करून निषेध केला आहे.कार्यक्रमाबाबत येथील सरपंच व ग्रामसेवकालासुद्धा कळविण्यात आले नाही. जर हे भवन शासनाच्या तिजोरीतून तयार करण्यात आले तर भाजप आपल्या पक्षाच्या कार्यक्रमासारखे कुणालाही न विचारता व न आंमत्रित करता सदर कार्यक्रम कसे करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.भारतीय जनता पक्षाच्या फंडातून जर भवन निर्माण झाले असते तर यावर कुणाचेही आरोप व आक्षेप नसते. अशा प्रकारच्या आयोजन करण्यावर शासन स्तराववरून बंदी आणावी व जाणूनबुजून दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे अपमान करणे थांबवावे. याकरिता आमदारांनीसुद्धा निमंत्रण ठेवून त्यांना प्रोटोकॉलसंबंधी सूचना द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यापुढे जर अशा प्रकारचे आयोजन केल्यास त्यांना काळेझेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, असा ईशारा पं.स. सदस्य दिलीप वाघमारे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)