शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्याच्या धानाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:41 IST

जिल्ह्यातील काही शासकीय धान खरेदीे केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर विक्री केला जात आहे. यासाठी व्यापारी बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे सांगत त्यांची बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षरी घेतली जात असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी केंद्रावरील प्रकार : कोऱ्या विड्रालवर स्वाक्षºया

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील काही शासकीय धान खरेदीे केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर विक्री केला जात आहे. यासाठी व्यापारी बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे सांगत त्यांची बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षरी घेतली जात असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.जिल्ह्यात यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाची एकूण शंभरावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शासनाने यंदा सर्वसाधारण धानाला १७५० व अ दर्जाच्या धानाला १७७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदा सर्वच धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात असून रेकार्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज या दोन्ही विभागाने वर्तविला आहे. काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना १२०० ते १४०० रूपये प्रती क्विंटल दराने विक्री केली. अशा शेतकऱ्यांची संख्या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. काही व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत शेतकºयांनाकडून १२०० ते १४०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केलेला धान जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर हमीभावाने विकण्यासाठी शक्कल लढविली आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केला जात नसल्याने काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर धानाची विक्री करणे सुरू केले आहे. धान विक्री केल्यानंतर त्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. मात्र ही सुध्दा अडचण जावू नये यासाठी व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्याच्या नावावर धानाची विक्री केली त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षऱ्या घेवून सदर रक्कम विड्राल करीत आहे. हा प्रकार आमगाव तालुक्यातील एका केंद्रावर घडल्याची माहिती आहे. याची अधिक चौकशी केली असता केवळ आमगावच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही केंद्रावर असाच प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पूर्णपणे डोळेझाक केली आहे.केंद्रावर सोयी सुविधांचा अभावजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. मात्र अद्यापही बऱ्याच केंद्रावर सोयी सुविधांचा अभाव असल्याने शेतकºयांचे धान चोरीला जात असल्याचे प्रकार सुध्दा घडले आहेत.महाराषष्ट्रातील धान छत्तीसगड, मध्यप्रदेशातमध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील सरकारने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर महाराष्ट्रात केवळ १७५० रुपये भाव मिळत आहे. प्रती क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपये मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अधिक मिळत असल्याने मागील आठवडाभरापासून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात धान या दोन्ही राज्यात जात आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी केला जातो. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा धान विक्री करण्याचा प्रकार आढळल्यास निश्चित संबंधितावर कारवाई केली जाईल.धान खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.- मनोज गोनाडे,ा्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदिया.