शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे ...

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे खरेदी करून खरीप हंगामातील धान पेरणी आटोपली. परंतु धान बियाणे ७० टक्केच उगवल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी केंद्रामधून बोगस बियाणे विक्री केली जात असल्याची शंका बळावली आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी केल्याबरोबर पऱ्हे टाकले होते. त्यांची धानाची पऱ्हे उगवली नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी पावसामुळे पऱ्हे टाकणे जगत नसल्यामुळे घाई-घाईने कृषी केंद्रामधून धानाची बियाणे घेऊन पऱ्हे भरून पेरणी आटोपली. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. पेरणीची घाई न करता बियाणांची उगवण क्षमता पडताळून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी अपेक्षित होते. बियाणे कंपन्याच्या जाहिरातीवर आकर्षित न होता बियाणांची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे आवश्यक असताना पेरणीचे हंगाम आटोपण्याच्या घाई-घाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून खरेदी केलेली बियाणे १०० टक्के उगवली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत आहे.

...........

आंध्र व मध्य प्रदेशातून आले बियाणे

या परिसरातील अनेक कृषी केंद्रांनी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून कमी किमतीच्या बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांना जास्त किमतीमध्ये बियाणे विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे बाेलल्या जाते. त्या बियाणांची उगवण क्षमता योग्य नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतली त्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशा कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना पक्के बिल दिले जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या दराने बियाणांची विक्री केली जात नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी विभागाने अशी बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.