शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

आॅनलाईनमुळे अडले शिक्षकांचे वेतन

By admin | Updated: December 16, 2014 22:56 IST

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला व्हावे याकरीता अधिकारी वर्गांना निवेदन

गोंदिया : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला व्हावे याकरीता अधिकारी वर्गांना निवेदन दिले. तसेच चर्चासुद्धा केली. परंतू शिक्षकांचे वेतन अजूनही सुरळीत सुरू झालेले नाही.आॅनलाईन वेतन प्रणाली एप्रिल २०१४ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत वेतन प्रणाली एप्रिल २०१४ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत वेतन २० ते २५ दिवस उशिरा होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना सोसायटी कर्ज व बँक कर्ज रक्कमेवरील व्याज अतिरिक्त भरण्याचा भुर्दंड पडत असतो. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असतो. नोव्हेंबर २०१४ चे वेतन आजपर्यंत झाले नाही. आॅनलाईन वेतनाच्या नावार ९ महिन्यापासून शिक्षकांचे ेवेतन खुप विलंबाने होत आहे. जि.प. शिक्षक विभागामुळे वेतन विलंबाने होत आहेत. शिक्षक विभागातील वेतन प्रणालित कर्मचारी शिक्षकांच्या वेतनाची काळजी होत नाही. शिक्षक संघाचे पदाधिकारी भेटण्यास गेले तर कार्यालयात उपलब्ध राहत नाही. वेतनाच्या अडचणी आहेत. त्यासुद्धा सांगत नाही. जि.प. शिक्षण विभाग वेतन प्रणालीमध्ये शिक्षकांचे विविध रजेचे बिल अडून पडलेले आहे. ते सुद्धा काढण्यात दिरंगाई होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आॅनलाईन वेतन प्रणाली मध्ये शिक्षकाचे वेतन महिन्याच्या १ तारखेला द्यावे, अशी सूचना देखील आहे. त्याची अंमलबजावणी केव्हा होईल हे सांगत येत नाही. ललीता राऊत गिरोला या शिक्षिकेची प्रस्तुती रजा दोन वर्षापासून मंजूर झालेली नाही. सदर शिक्षिकेची रजेची फाईल जि.प. शिक्षण विभाग कर्मचारी लहान लहान कारणासाठी अडवून ठेवलेली आहे. उच्च परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकाचे परवानगी सुद्धा अडलेल्या आहेत. शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम, गणेश चुटे, एम.आर. बोपचे, चंद्रशेखर दमाहे, अयुब खान, विनोद सूर्यवंशी यु.एन. उपवंशी यासाठी प्रयत्नशील आहेत.