शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सालेकसाची सोनाली रुपेरी पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:24 IST

एखाद्या व्यक्तीच्या अंगी जन्मजात कलागुण असले तर त्याला कोणत्याही प्रशिक्षणाची फारशी गरज पडत नाही

छत्तीसगडी चित्रपटातील नायिका : अभिनय व नृत्य कलेतून घेतली भरारी लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एखाद्या व्यक्तीच्या अंगी जन्मजात कलागुण असले तर त्याला कोणत्याही प्रशिक्षणाची फारशी गरज पडत नाही आणि योग्य व्यासपीठ मिळाले तर कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी लाभते. असेच काही घडत आहे ते येथील सोनाली उर्फ आचल शहारे या मुलीसोबत. तिने आपल्या अंगी असलेल्या अभिनय व नृत्य कला या गुणांमुळे प्रभाव पाडला आहे. सोनालीने रूपेरी पडद्यावरील पदार्पणात छत्तीसगडी चित्रपटात भूमिका साकारली आहे. ४ जून १९९२ रोजी दलित कुटूंबात जन्माला आलेली सोनाली शहारे हिने बालपणापासून घरात अठराविश्वे दारिद्रय पाहिले. पानठेला लावून घरचा गाडा खेचणारे वडील सुखदास शहारे सोनाली १७ वर्षांची असतानाच सन २००८ मध्ये सोडून गेले. त्यामुळे आई शीला शहारे, भाऊ असीम व सोनाली यांच्यावर संकटाचे आभाळ कोसळले. यात सोनाली आणि तिच्या भावाचे शिक्षण सुध्दा अर्धवट राहिले. परंतु सोनालीच्या अंगी जन्मजात असलेल्या नृत्य व अभिनय कला तिच्या भविष्यात मैलाचा दगड ठरेल तिला हे कल्पनेत नव्हते. मागील वर्षी ती फोटो काढण्यासाठी येथील एटीएस स्टुडीओ मध्ये गेली असता तिची ओळख स्टुडीओचे संचालक अनिल सोयाम यांच्याशी झाली. सोयाम यांनी तिचा आकर्षक चेहरा आणि वागणूक बघून चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर करशील का असा प्रश्न विचारला. यावर सोनालीने होकार दिला. सोयाम यांचे मित्र प्रणव झा हे छत्तीसगडी चित्रपटांचे निर्माता निर्देशक असून या दोघांची घट्ट मैत्री आहे. झा यांनी दोन वर्षापूर्वी बी.ए.फर्स्ट ईयर नावाचा छत्तीसगडी चित्रपट काढला व तो चित्रपट खूप गाजला होता. त्यामुळे त्याचा दुसरा भाग निर्मीत करावा असे वाटले व त्यांनी बी.ए.सेंकड इयर नावाचा चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. परंतु यावेळी चित्रपटात नवीन नायीका घेण्याचे ठरविले व नवीन मुलीच्या शोधात असतानाच त्यांनी सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता सोयाम यांनी सोनालीबद्दल विस्तृत माहिती देत भेट करवून दिली. झा यांना सोनालीचा चेहरा आवडला व त्यांनी आपल्या चमूसह सोनालीचा स्क्रीन टेस्ट घेतली. त्यात सोनाली उत्तीर्ण झाली आणि तिला बी.ए.सेकड इयर या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून अभिनय करण्याची सोनेरी संधी लाभली. सन २०१६ मध्ये चित्रपटाची शूटींग सुरु झाली. सदर चित्रपटाची शूटींग छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरीसा आणी केरळ या राज्यात करण्यात आली. चित्रपटात सोनालीचे नृत्य आणि अभिनय सर्वश्रेष्ठ दिसून आले. २६ मे २०१६ रोजी बी.ए.सेंकड इयर हे चित्रपट छत्तीसगडची राजधानी रायपूरसह इतर महत्वाच्या शहरात रिलीज करण्यात आला. सुरुवातीपासून प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला व मागील चार आठवड्यापासून राज्यातील १७ चित्रपटगृहांत सतत चालत असून सर्व प्रेक्षकांनी सोनालीचे नृत्य आणि अभिनय जास्त पसंत केले आहे. परंतु प्रेक्षकांना नायीका ही मूळत: महाराष्ट्र राज्यातील सालेकसा येथील राहणारी असल्याची माहितीही नसावी. सालेकसा तालुका छत्तीसगडी राज्याच्या सीमेलगत असून या तालुक्यात हिंदी, मराठी सह छत्तीसगडी भाषेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सोनालीला भाषेची अडचण आली नाही. मराठी व भोजपुरी चित्रपटाचा प्रस्ताव छत्तीसगडी चित्रपटात दमदार अभिनय व कला दाखविल्यानंतर त्या चित्रपटाला पाहून काही मराठी आणि भोजपुरी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सोनाली सोबत संपर्क करुन आपल्या चित्रपटात नायीका बनविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सोनालीनेही त्यांना सकारात्मक उत्तर दिले असून चित्रपटसृष्टीत सोनालीचे भविष्य प्रकाशाकडे वाटचाल करताना दिसत आहे. सोनाली सालेकसा तालुक्याची पहिली व एकमेव मुलगी चित्रपटात नायिका म्हणून पदार्पण करणारी आहे.