शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत कृषी विद्यापीठ स्थापणार

By admin | Updated: August 19, 2015 02:06 IST

पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

प्रक्रियेला येणार वेग : काशिवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, शेतकऱ्यांना मिळणार लाभसाकोली : पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व सिंदेवाही तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली ही नावे विचारात घेऊन शासनाने कृषी विद्यापीठ स्थापनेची प्रक्रिया सुरु केली होती. पक्षीय राजकारणामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, साकोली येथे कृषी विद्यापीठ स्थापण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केली असून साकोली येथे कृषी विद्यापीठ किंवा शासकीय कृषी महाविद्यालय स्थापनेसंदर्भात मागणी केली. त्यामुळे दोन पैकी एक मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार काशीवार यांनी दिली.साकोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे केंद्रबिंदू असून साकोली हे राष्ट्रीय महामार्गावर आहे. साकोलीला लागूनच असलेल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ कुंभली येथे धान संशोधन केंद्र असून येथे विद्यापीठाची ९० एकर जागा आहे. कृषी विद्यापीठासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जातात. तसेच भातपिकानंतरच भाजीपाला, कडधान्य, ऊस यासारखेचही मिश्र पिके या जिल्ह्यातून घेतली जातात. त्यामुळे परिसरातील लोकांना याचा फायदा मिळावा यासाठी साकोली येथे कृषी विद्यापीठाची स्थापना योग्य राहणार आहे. साकोलीपासून १०० कि.मी. अंतरावर नागपूर येथे शासकीय कृषी महाविद्यालय आहे. तर दुसरे खासगी महाविद्यालय लाखनी तालुक्यात आहे. त्याच आधारावर साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय झाल्याचा याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. असेही मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्ह्यात सिंचनाची साधने जास्त असून धानाचे उत्पादन इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यात अधिक असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयाची निर्मिती होणार अशी माहिती काशिवार यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)