साकोली : तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असून यासाठी शिक्षकांसह शिक्षक संघटना पाठपुरावा करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या समस्या निकाली लागल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या समस्या तात्काळ सोडवाव्या यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका साकोली तर्फे जिल्हा सरचिटणीस शिलकुमार वैद्य यांच्या नेतृत्वात खंड विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.यात चट्टोपाध्याय प्रस्ताव सादर करणे, रजेचे थकीत देयके निकाली काढणे, वैद्यकीय परिपूर्ती व देयके निकाली काढणे, निवडश्रेणीकरिता प्रस्ताव व नाव पाठविणे, इतर थकीत देयके निकाली काढणे, दुय्यम सेवापुस्तिका अद्यावत करणे, सहावे वेतन आयोगास वित्त लेखा अधिकारी यांची मंजुरी घेणे, शालेय पोषण आहार पुरवठा मागणी पत्रकानुसार करणे, शालेय पोषण आहार थकबाकी प्रतिमाह देणे या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस शिलकुमार वैद्य, एच.के. लंजे, डी.डी. वलथरे, पी.टी. हातझाडे, अशोक हजारे, सी.सी. हजारे, भाऊराव समरीत, वाय.टी. हुकरे, डी.ए. थाटे, मनोज ढवळे, रविंद्र हटवार, सोनू भेंडारकर, आर.बी. रोकडे, अशोक राऊत, डी.बी. अंबादे, बी.जी. भुते, वाय.जी. पटले, सुरेश ठाकरे, बी.के. धार्मिक, शाम मुंगमोडे, एम.एम. नाकाडे, नितीन रामटेके, आर.डी. पारधी, बिंदुसार गडपायले, आर.बी. गजभिये, आर.बी. रामटेके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत शिक्षकांची बीडीओंशी चर्चा
By admin | Updated: November 8, 2015 01:44 IST