शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील सुरक्षा पाईप तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:59 IST

तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देपरवानगी न घेता जेसीपीने खोदकाम : फौजदारी कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाचे सुरक्षा पाईप तोडणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील लोखंडी सुरक्षा पाईप तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबीने खोदकाम केले. ग्रामपंचायतने शासकीय मालमत्तेचे नुकसान केले तर कंत्राटदाराने पाईप नेल्याचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच महेंद्र बागळे, ग्रा.पं.सदस्य रुपेश अंबुले यांनी केली आहे. रस्त्यालगतच मोठा खड्डा खोदल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याच मार्गावरुन मध्यप्रदेशातील बालाघाट व महाराष्ट्रातील वाहनाची वर्र्दळ असते. खोदकाम केलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक सुध्दा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. हे सर्व काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची सुध्दा परवानगी घेण्यात आली नाही. या विभागाचे उपविभागीय कार्यालयातील शाखा अभियंता मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता ग्रा.पं.ने कसल्याही प्रकारची मंजुरी घेतली नसल्याचे सांगितले. शिवाय यासंबंधीचे कुठलेही पत्र दिलेले नाही. दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करुन पुढील कारवाही करण्यात येईल असे सांगितले. ग्रामसेवक सोनवाने यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतpwdसार्वजनिक बांधकाम विभाग