शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा नगर पंचायत येणार विकासाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:03 IST

विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या सालेकसा नगर पंचायतला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी धडपड करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले असून शासनाने पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

ठळक मुद्देपुराम यांच्या प्रयत्नांना यश : शासनाने दिला पाच कोटींंचा निधी, सुविधांचा लाभ मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या सालेकसा नगर पंचायतला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी धडपड करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले असून शासनाने पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी नव्याने स्थापित झालेली नगर पंचायत विकासाच्या प्रवाहात येणार आहे.डिसेंबर २०१७ मध्ये नगर पंचायतमध्ये प्रथमच नगराध्यक्ष व नगर पंचायत कमिटीची स्थापना झाली. तेव्हापासून मागील शिल्लक रकमेतून लहानमोठी कामे केली जात होती. त्यातून स्थानिक नागरिकांच्या ज्वलंत समस्या दूर होत नव्हत्या. ही व्यथा नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. संजय पुराम यांच्याकडे मांडली. यावर आ.पुराम यांनी निधी मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा केला. यात त्यांना यश आले असून अर्थमंत्र्यांनी सालेकसा नगर पंचायतच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर करुन तसे पत्र पुराम यांना सोपविले.आ.पुराम यांनी त्वरित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाºयांना पाचारण केले व त्यांना निधी मंजुरीचे पत्र सोपविले. त्यामुळे नगर पंचायतचे पदाधिकारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केला. मिळालेल्या निधीतून नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज व्यवस्था, नाली बांधकाम यासह विविध सोयीसुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.आ. पुराम यांच्या सहकार्यामुळे नगर पंचायतला पाच कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल नगराध्यक्ष विरेंद्र उईके, उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, गणेश फरकुंडे यांनी त्यांचे आभार मानले.नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दिशेने आपले सतत प्रयत्न असतात. यासाठी आपण शासन दरबारी सतत झटत असतो. त्या प्रयत्नांना यश मिळून शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.-संजय पुराम,आमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.