शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दमदार एंट्री

By admin | Updated: July 23, 2016 02:23 IST

मागील काही दिवसांपासून नाराज असलेल्या वरूणदेवाने पुन्हा अपली दमदार एंट्री लावली असून

देवरी तालुक्यात अतिवृष्टी : १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद गोंदिया : मागील काही दिवसांपासून नाराज असलेल्या वरूणदेवाने पुन्हा अपली दमदार एंट्री लावली असून गुरूवारपासून जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे. मात्र आहे या पावसापेक्षा अधिक पाण्याची गरज असल्याने शेतकरी आताही आकाशाकडे बघत आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी ४४२.९ मीमी. आहे. तर देवरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. मध्यंतरी दमदार पावसामुळे जिल्हा जलमय झाला होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यात पुर स्थिती निर्माण होण्याचे चित्र दिसून येत होते. एकंदर दमदार पावसामुळे सर्वच खुश होते व शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र मागील आठ-दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे दिसू लागले. दिवसाभरात एखादी रिपरिप एवढाच पाऊस बरसत होता. अचानक वरूणराज नाराज झाल्याने शेतीची कामे बंद पडली आहेत. शिवाय वातावरणात उकाडा वाढू लागला व उन्हाळा परतून आला असे वाटू लागले होते. उकाड्यामुळे पुन्हा कुलर वापरणे सुरू करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गुरूवारपासून (दि.२१) पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत १४६१७.१ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी ४४२.९ मीमी. एवढी आहे. तर शुक्रवारी (दि.२२) सकाळपर्यंत जिल्ह्यात ५७३.६ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी १७.३ मीमी. एवढी आहे. यात गोंदिया तालुक्यात ५८ मीमी., गोरेगाव २८.१ मीमी., तिरोडा २१.३ मीमी., अर्जुनी-मोरगाव १६४ मीमी., देवरी ८१ मीमी., आमगाव ५८ मीमी., सालेकसा ६२.४ मीमी. तर सडक-अर्जुनी तालुक्यात १००.८ मीमी. अशी ५७३.६ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून त्याची सरासरी १७.३ मीमी. आहे. (शहर प्रतिनिधी)