रावणवाडी : गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील जि.प. शाळा तसेच अनुदानित खासगी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा दाखला प्राप्त करून घेण्यासाठी गावागावातील घरोघरी हजेरी लावत आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांना अनेक प्रकारचे आमिष देऊन विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा दाखला हस्तगत करीत असल्याचा चित्र परिसरात दिसून येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरूवातीपासून अतापर्यंत अनुदानित जि.प. शाळा खासगी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा शोध मोहिमेवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवित आहेत. परिसरातील अनेक प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. यामुळे शिक्षकांचे भविष्य टांगणीला आहे. शिक्षकांनाही आपली नोकरी वाचवण्याची चिंता भेडसावत असल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकांना दिशानिर्देशाने शिक्षक, मुख्याध्यापक गावागावांत जाऊन पालकांच्या घरी हजेरी लावत आहेत. शिक्षणाचा स्तर शिक्षकांचे शाळेतील कार्याबद्दल माहिती सर्वसामान्यांना असल्यामुळेच श्रीमंतापासून मध्यम वर्गाचे नागरिक आपल्या पाल्यांना विना अनुदानित उच्च शिक्षा देणाऱ्या खासगी शाळेत शिकविणाऱ्याकडे पाठवीत अहेत. या खासगी शाळांमध्ये मोठी रक्कम भरून आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करीत आहेत. एकीकडे अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांचा तुटवडा भासत असल्यामुळे अनुदानित शाळेत तुकडी वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणे सुरू आहे. अनुदानित शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्येत मोठी घसरण झाली आहे. अनुदानित शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक विद्यार्थ्याची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना विविध प्रकारचे आमीष देऊन सर्वच सोय सुविधा, प्रवासी पास आदि सोई उपलब्ध करून देण्याचे प्रलोभन देताना दिसतात. पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत दाखला करवून घेण्यास नकार दिला असला तरी काही सुज्ञ नागरिकांच्या शिफारशी करवून घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचा दाखला हस्तगत करून घेण्याचा प्रकार ग्रामीण भागात सुरू आहे. बहुतांश शाळांत विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी नसल्याने तुकड्या बंद होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांची ढासळती पटसंख्या, विना अनुदानित उच्च खासगी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अनुदानित शाळा, जिल्हा परिषद व खासगी शाळेतील रोडावलेल्या संख्येमुळे शिक्षक व संस्था संचालकांमध्ये तुकडी तुटण्याची भीती सतावत आहे. अनुदानित शाळेच्या पूर्वीचा इतिहास आणि वर्तमानकाळातील शाळेच्या इतिहासात बरीच तफावत दिसून येत आहे.(वार्ताहर)
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची शोध मोहीम सुरू
By admin | Updated: June 25, 2014 00:32 IST