शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेवर धावणार सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:09 IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना येथील आयटीआयचा विद्यार्थी प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे याने सौर उर्जेवर धावणारी सायकल तयार केली आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेल मर्यादीत असल्याने आणि वाढत्या प्रदूषणावर मात करून शून्य खर्चात प्रवास करता यावा या हेतूने प्रज्वलने ही सायकल तयार केली आहे.

ठळक मुद्देआयटीआयच्या विद्यार्थ्याची कमाल : ऊर्जामंत्र्यांनी दिले मुंबईचे निमंत्रण

राजीव फुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना येथील आयटीआयचा विद्यार्थी प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे याने सौर उर्जेवर धावणारी सायकल तयार केली आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेल मर्यादीत असल्याने आणि वाढत्या प्रदूषणावर मात करून शून्य खर्चात प्रवास करता यावा या हेतूने प्रज्वलने ही सायकल तयार केली आहे.येथील तुलसी आयटीआयमधील द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रज्वल याला लहानपनापासूनच टाकाऊपासून टिकावू वस्तू किंवा यंत्र तयार करण्याचा छंद आहे. शालेय जीवनात अनेक घडामोडींवर लक्ष ठेवून त्याने कायमस्वरुपी यंत्र तयार केले. त्यात आता सौर उर्जेवर चालणारी सायकल या त्याच्या प्रयोगाने प्रज्वलची स्वत:ची ओळख निर्माण करवून दिली आहे. सौर उर्जेवर एक तासात ३५ किमी. अंतर या सायकलने गाढता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायडल मारुनही सायकल चालविता येवू शकते. ही सोलर सायकल तयार करण्यासाठी प्रज्वलने सोलर संच, सायकल, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटार आदी साहित्यांचा वापर केला आहे.सध्या डिझेल व पेट्रोल दर आभाळ गाठत आहेत. अशा स्थितीत सोलर सायकल निसर्गाने भेट दिलेल्या सौर ऊर्जेवर धावणार असल्याने आर्थिक बचत होणार आहे. या प्रयोगासाठी गणेश ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक विजय बहेकार यांनी आर्थिक मदत केली असल्याचे प्रज्वलने प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले. भंडारा येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत सोलर सायकलचे कौतुक करुन जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे हे विशेष.शिक्षणासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षाप्रज्वलचे आई-वडील मजुरी करीत असून त्याला पुढे उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण घरात अठराविश्व दारिद्र असल्यामुळे मधातच शिक्षण सोडण्याची पाळी आली आहे. अशात शासनाने उच्च शिक्षणासाठी मदत करावी अशी अपेक्षा प्रज्वलच्या पालकांनी व्यक्त केली.भविष्यात सोलर चारचाकी तयारी करण्याची इच्छावाहनांमुळे होत असलेल्या प्रदुषणाचे तोटे आता समोर येवू लागले आहेत. त्यामुळे यावर मात करण्यासाठी फक्त सायकलवर गप्प न बसता भविष्यात चारचाकी वाहन तयार करण्याची प्रज्लवची इच्छा आहे. त्याकरीता उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी लागणार आहे. त्यानंतर चार-तिनचाकी सोलर वाहन जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणार असे प्रज्वल सांगतो.