शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे.

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा फुगत असल्याने गावातील विकास कामे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिहोरा गावात शासकीय अनुदान तथा योजनांचा निधी गावाच्या विकासाला तारणहार ठरला आहे. यामुळे गावात अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे. परंतु या पलिकडे अन्य विकास कामे प्रभावित झाली आहेत. गावात नाविण्यपूर्ण विकास कामांना थकबाकीची अडचण समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या गावात घरकरांचे नागरिकांवर १३ लाख ७५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी असून डोकेदुखी ठरणारी आहे. एकूण १८ लाख ७६ हजार ९२५ रुपयाची थकबाकी असताना फक्त ५ लाख ६५ हजार ५६५ रुपयाची वसुली झाली आहे. या थकबाकीत बडे आसामी असल्याची माहिती मिळाली आहे. थकीत कराची वसूली करताना जप्तीची कारवाई होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढता आहे. सार्वजनिक दिवाबत्तीचे ४२ हजार ८१५ रुपये थकीत असल्याने ही दिवाबत्ती अडचणीत आली आहे. गावागावात थकीत कर विज बिलांचे देयक धारकांवर कनेक्शन कपातीचा दांडा महावितरण उगारला आहे. हीच भीती सार्वजनिक दिवाबत्तीला आडकाठी ठरणार आहे. या गावात उपकराची थकबाकी नाकी नऊ आणणारी आहे. ४३ हजार १०५ रुपयाची थकबाकी थक्क करणारी आहे. तर धंदा कर ५४९ रुपयाची थकबाकी आहे. धंदाकरांच्या वसुलीत प्रामाणिकपणा दिसून येत आहे. परंतु जीवन असणाऱ्या पाणी संदर्भात मोठी कंजुशी कर वसुलीत दिसून येत आहे. या गावात पाणी पुरवठा योजनेत सामान्य आणि खास अशी विभागणी करण्यात आली आहे. सामान्य पाणीपट्टी कराची वसुली झाली आहे. यात १ लाख २८ हजार ५४५ रुपयाची थकबाकी दिव्याखाली अंधार असा संदेश देत आहे.खास पाणी पुरवठा नळ योजनेची वसुली १ लाख २४ हजार ४४० रुपये झाली आहे. ३ लाख ५१० रुपयाची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. वाढत्या थकबाकीने शुद्ध पाणीच दुषित होण्याची चिन्हे आहेत. पोाणी पट्टी आणि नळ योजनेची एकुण थकबाकी ४ लाख २९ हजार ५५ रुपये आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकीची वसुली महत्वपूर्ण ठरणारी आहे. गावात विविध कराची एकूण थकबाकी १८ लाख २६ हजार ८८४ रुपये आहे. ही थकबाकीची वसुली गावाच्या विकासात रामबाण ठरणार आहे. परंतु थकबाकी आजवर शुन्यावर आली नाही .गावाच्या विकासात गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. वाढती थकबाकी तथा टक्केवारी पूर्ण करण्यात येत नसल्याने शासन अनुदान वाटपात कात्री लावत आहे. अशा गावांना अनुदान राशी वाटपात ठेंगा दाखवत आहे. यामुळे गावात विकास कामे प्रभावित ठरत आहेत.याउलट गावात विकास कामे होत नसताना ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात येत आहे. अन्य गावातही हीच अवस्था आहे. गावाच्या विकासात गावकऱ्यांची सहकार्याची गरज आहे. (वार्ताहर)