शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीपेक्षा २.४४ कोटींनी वाढली रॉयल्टी

By admin | Updated: May 28, 2015 01:23 IST

गोंदिया वनविभागात असलेल्या एकूण १२ वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाचे एकूण २९ घटक (युनिट्स) आहेत.

देवानंद शहारे गोंदियागोंदिया वनविभागात असलेल्या एकूण १२ वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाचे एकूण २९ घटक (युनिट्स) आहेत. त्याली ६२ उपघटकांच्या ई-लिलावातून यावर्षी तब्बल नऊ कोटी २३ लाख ३७ हजार ७८२ रॉयल्टी रक्कम वन विभागाला प्राप्त झाली. गेल्या २०१४ मध्ये सहा कोटी ७८ लाख ५२ हजार १७६ रॉयल्टी रक्कम मिळाली होती. त्यामुळे यंदा तेंदूपत्ता ई-टेंडरिंगद्वारे तब्बल २.४४ कोटींची अधिक रॉयल्टी प्राप्त झाली आहे.गोंदिया वनविभागात गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, उत्तर देवरी, दक्षिण देवरी, सडक-अर्जुनी, चिचगड, गोठणगाव, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा अशी एकूण १२ वनपरिक्षेत्र आहेत. सन २०१५ तेंदू हंगामात गोंदिया वनपरिक्षेत्र हे एक घटक असून त्यात मुंडीपार, दासगाव, गोंदिया व गंगाझरी या चार उपघटकांचा समावेश आहे. या घटकांच्या लिलावातून नऊ लाख ९०९ रूपयांची रॉयल्टी संबंधित कंत्राटदाराकडून प्राप्त झाली असून १२०० पोती तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट आहे.गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या गोरेगाव, हिरापूर व पिंडकेपार या घटक समुहासाठी २० लाख ८९ हजार ९२९ रूपये प्राप्त झाले असून १३०० पोती तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट तर घुमर्रा व निंबा या घटक समुहासाठी आठ लाख ८९ हजार ९२९ रूपये प्राप्त झाले असून येथे ६०० पोती तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट आहे. आमगाव वनपरिक्षेत्रात आमगाव व अंजोरा या घटक समुहासाठी एक लाख २१ हजार रूपये प्राप्त झाले असून ४०० पोतींचे उद्दिष्ट आहे. सालेकसा घटकाच्या लिलावातून १६ लाख ५९ हजार ९६९ रूपये प्राप्त व १८०० पोतींचे उद्दिष्ट, दर्रेकसा १ व २ च्या लिलावातून ५८ लाख ८९ हजार ९६९ रूपये व २२०० पोतींचे उद्दिष्ट, बिजेपार, साखरीटोला व मानागड समुहाच्या लिलावातून ३२ लाख ८९ हजार ९५९ रूपये व १७०० पोती तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट आहे. उत्तर देवरी परिक्षेत्रातील देवरी व शेरपार घटक समुहाच्या लिलावातून ३४ लाख ८९ हजार ९३९ रूपये व १०५० पोतींचे उद्दिष्ट, भागी व मुल्ला समुहातून ८१ लाख ८९ हजार ९१९ रूपये व २५०० पोतींचे उद्दिष्ट, सावली व पुराडा समुहातून २९ लाख ८९ हजार ९८९ रूपये व १५०० पोतींचे उद्दिष्ट, दक्षिण देवरी परिक्षेत्रातील कोसबी घटकातून २७ लाख ८९ हजार ९१९ रूपये व १४०० पोतींचे उद्दिष्ट, कन्हाळगाव व परसोडी समुहातून ३३ लाख ८९ हजार ९७९ रूपये व १४०० पोतींचे उद्दिष्ट, म्हैसूली, पळसगाव व बोंडे समुहातून ४७ लाख ८९ हजार ९८९ रूपये व १९०० पोतींचे उद्दिष्ट आहे.सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्राचे चार घटक असून सौंदड, कोहमारा, डोंगरगाव, शेंडा, जांभळी, रेंगेपार व कोसमतोंडी या उपघटकांचा त्यात समावेश आहे. या चार घटकांच्या लिलावातून एक कोटी ५४ लाख दोन हजार ८१६ रूपये प्राप्त झाले असून एकूण सात हजार ५० पोती संकलनाचे उद्दिष्ट आहे. चिचगड वनपरिक्षेत्राचे चार घटक असून त्यात ककोडी, वडेकसा, चिचगड, पिपरखारी, कडीकसा, मगरडोह, पालांदूर या उपघटकांचा समावेश आहे. या घटकांच्या लिलावातून एक कोटी ५९ लाख ३९ हजार ९३६ रूपये प्राप्त झाले. तर सहा हजार ६०० पोती संकलनाचे उद्दिष्ट आहे. गोठणगाव परिक्षेत्रात दोन घटक असून गोठणगाव, केशोरी, तिरखुरी एक व दोन, राजोली या उपघटकांचा समावेश आहे. या घटकांच्या लिलावातून ७८ लाख ७९ हजार ८७८ रूपये व चार हजार ५०० पोती संकलनाचे उद्दिष्ट आहे. नवेगावबांध परिक्षेत्राचे दोन घटक असून नवेगावबांध, बोरटेकडी, कवठा, पवनी व बाराभाटी असे उपघटक आहेत. या घटकांच्या लिलावातून ६० लाख २८ हजार ९७८ रूपये व तीन हजार ५०० पोती संकलनाचे उद्दिष्ट आहे. अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्राचे दोन घटक असून अर्जुनी-मोरगाव, बोंडगाव, धाबेटेकडी, वडेगाव, महागाव या उपघटकांचा समावेश आहे. या घटकांच्या लिलावातून ४७ लाख ८९ हजार ९१९ रूपये व तीन हजार ४०० पोतींचे उद्दिष्ट आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रात दोन घटक असून तिरोडा, वडेगाव, इंदोरा व गोविंदटोला या उपघटकांचा समावेश आहे. या घटकांच्या लिलावातून १८ लाख १४ हजार ७९७ रूपये व दोन हजार पोती संकलनाचे उद्दिष्ट आहे. गोंदिया वन विभागात २९ घटकांच्या माध्यमातून एकूण ४६ हजार तेंदूपाने संकलनाचे उद्दिष्ट आहे. यात काम करणाऱ्या मजुरांना बोनसही दिले जाते.