शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:47 IST

मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : शेतातील कामे अर्धवटच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात रोवणीची कामे अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.यंदा पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे पेरणीची कामे उशीरा झाली. पेरणीनुसार रोवणीची कामे जुलै अखेर संपणे अपेक्षित होते. परंतु आॅगस्ट महिना सुरू होऊनही रोवणीची कामे आटोपली नाहीत. अनेक शेतकºयांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी सर्व पिकांच्या पेरणी करीत भात रोवणीसाठी पºहे सुद्धा टाकले होते. त्यानुसार नर्सरीला एक ते सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सामान्यत: २० ते २५ दिवसांची नर्सरी रोवणीसाठी उत्तम मानली जाते. उशीरा रोवणी केल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. सध्या वरथेंबी पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतात पाणी नसल्याने शेतकºयांनी रोवणीची कामे अर्ध्यावर आहेत.जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पीक समाधानकारक दिसत आहे. परंतु ज्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी पूर्ण केली, ते पºहे मरत आहेत. रोपवाटिका वाळत असल्याचे चित्र आहे.उत्पादन होणार निम्म्यापेक्षा कमी१५ आॅगस्टपर्यंत हलक्या धानाची मुदत असते. मात्र १५ आॅगस्टनंतर केलेल्या रोवणीचा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे पुढे पाऊस आला तरी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी येईल, अशी शंका शेतकºयांंनी व्यक्त केली आहे. धान शेतात लावून अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पण पावसाचा पत्ताच नाहीत. जो दिवस उगवतो तो सारखाच असतो. त्यामुळे या वेळी शेतकºयांचे बेहाल होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.नदी-नाले कोरडेचपावसाळा कोरडाच जात आहे. पावसाचे तीन ते चार नक्षत्र लोटूनही मुंडीकोटा परिसरात नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पंप धारकांनी पावसाची वाट न बघता पºहे लावले व रोवणीलाही सुरुवात केली. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेला शेतकरी पावसाची वाट पहात आहे. अनेक शेतकºयांचे लावलेले बियाणे वाया गेले. दुसरीकडे पंपधारकांनी जोमात पेरणीला सुरुवात केली. मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने विहीर, बोअरवेल, नदी, नाले कोरडे आहेत. कशीतरी पेरणी केली, परंतु रोवणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी निराश होत आहे. मात्र पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र चिंतेमध्ये आहेत. या परिसरात बहुतांश रोवण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या पºहांना ४० ते ५० दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ते रोवण्यायोग्य नाही. रोपे वाळत चालले असून जमिनीला भेगा पडत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.