शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीच्या कक्षाचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:42 IST

नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती दिलीप गोपलानी यांच्या नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले. त्यावेळी त्यांच्या कॅबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी घटना टळली.

ठळक मुद्दे नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती दिलीप गोपलानी यांच्या नगर परिषदेतील कक्षाचे छत अचानक कोसळले. त्यावेळी त्यांच्या कॅबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी घटना टळली. यामुळे नगर परिषदेच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मंगळवारी (दि.२९) दुपारी अचानक सभापती गोपलानी यांच्या कक्षाचे छत एका ठिकाणातून कोसळले. घटनेची माहिती मिळताच न.प.चे प्रशासकीय अधिकारी राणे व इतर कर्मचारी पाहण्यासाठी तेथे पोहोचले. दरम्यान दुसºया ठिकाणावरूनही छत कोसळले. त्यामुळे तेथे पाहण्यासाठी गेलेल्या सर्व कर्मचाºयांनी तेथून पळ काढला. तत्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे तीन चार महिन्यांपूर्वीच त्या ठिकाणी सभापती यांच्यासाठी कक्ष तयार करण्यात आले होते. कक्षात नवीन फर्निचर लावण्यात आले होते. यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. पूर्वी या कक्षाच्या ठिकाणी लेखा विभागाचे कार्यालय होते. परंतु पावसामुळे लेखा विभागाचे दस्तावेज खराब होवू नये, यासाठी सदर कार्यालय जवळपास दोनतीन वर्षांपूर्वीच हटविण्यात आले होते. ही बाब माहीत असतानासुद्धा सभापती यांचे कक्ष त्या ठिकाणी का तयार करण्यात आले? यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ज्या ठिकाणी हे कक्ष आहे ते नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य भवनाच्या वरील माळ्यावर एका कोपºयात आहे. त्याच्यावरील मजल्यावर मुख्याधिकारी व नगर परिषदेचे अध्यक्ष यांचेसुद्धा कक्ष आहे. परंतु ते पूर्णत: सुरक्षित आहे. पाणी पुरवठा सभापती यांच्या कक्षाजवळ दोन खोल्यांमध्येसुद्धा पाऊस पडताच पाणी साचते. पावसाळ्याचे पाणी बाहेर काढण्याची कसलीही व्यवस्था या भवनात करण्यात आली नाही. यामुळे येथे कधी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी वाहून जाण्यासाठी कसलीही योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात छताला ओलावा येतो. अनेक वर्षांपासून हिच स्थिती आहे. नगर परिषदेची नवीन इमारत बनविण्यासाठी आतापर्यंत कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. यावर अधिक बोलता येणार नाही.-सी.ए. राणेप्रशासकीय अधिकारी,न.प. गोंदिया