शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रोहयो कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: September 3, 2015 01:36 IST

तालुक्यातील चिचखेडा ग्रामपंचायती अंतर्गत २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या स्मशानभूमी सपाटीकरणाच्या कामावरील हजेरी पत्रकात मोहाडी येथे वास्तव्यास असलेले,

चिचखेडा येथील प्रकार : हजेरी पत्रकात मोहाडीतील नागरिकांची नावे मोहाडी : तालुक्यातील चिचखेडा ग्रामपंचायती अंतर्गत २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या स्मशानभूमी सपाटीकरणाच्या कामावरील हजेरी पत्रकात मोहाडी येथे वास्तव्यास असलेले, नागपूरला गेलेले, सनफलॅग कंपनीत काम करणाऱ्या लोकांचे बोगस नावे टाकून गरिबांच्या हिश्श्याचा पैसा रोजगार सेवकाने हडपल्याचा आरोप सोमेश्वर बोंदरेसह काही गावकऱ्यांनी बिडिओ यांना दिलेल्या तक्रारीद्वारे केला असून या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.गावातील कष्टकरी, भूमीहीन मजुरांसाठी शासनाने रोजगार गारंटी योजना सुरु केली. या योजनेद्वारे गावातील मजुरांना उन्हाळ््यात कमीत कमी १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन दिला. तसेच या योजनेद्वारे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र खरोखरच या योजनेचा संपुर्ण पैसा मजुरांसाठीच खर्च करण्यात येतो का, याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष राहिलेले नसल्याने रोहयो योजनेत दिवसेंदिवस भ्रष्टाचार फोफावत आहे. दररोज रोहयो कामावरील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असताना सुद्धा थातुर-मातुर चौकशी करुन भ्रष्टाचारांना रानमोकळे करुन देण्यात येत आहे. चिचखेडे येथे यावर्षी स्मशानभूमी सपाटीकरणाचे काम रोहयोंतर्गत करण्यात आले. या कामावरील हजेरीपटात मोहाडी येथे वास्तव्यास असलेले एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील तीन व्यक्तींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे कुटंूब सधन असून त्यांच्याकडील शेतीवर मजूर आहेत. ते ते कुटूंब रोहयो कामावर मजुरीसाठी जातील का हे विचार करण्यायोग्य गोष्ट आहे. नागपूर येथे एका कंपनीत काम करणारा, सनफलॅग कंपनी वरठी येथे काम करणारा, लग्न होऊन सासुरवाडीला गेलेल्या मुलीचे व खुद्द तक्रारकर्त्याचे नाव त्या हजेरीपटात दर्शविण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता याने हे हजेरीपट इंटरनेटवरुन बघून त्याची प्रत काढली तेव्हा हे बिंग फुटले. व कामावर न जाताही त्याचे स्वत:चे नाव बघून तोही चक्रावला. याबाबत, झालेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारला असता रोजगार सेवक नरेश बोंदरे याने तक्रारकर्ता सोमेश्वर बोंदरे याला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली व तुम्ही कोठेही तक्रार करा, माझी वरपर्यंत सेटींग आहे, माझे कोणी काही बिघडवू शकत नाही असे अरेरावीचे उत्तर दिले असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. एकनाथ गाढवे, श्रीराम गाढवे, सुनंदा गाढवे हे मोहाडी येथे वास्तव्यास असून ते सधन कुटुंब आहेत. श्रीराम गाढवे हे रापनीमधून नुकतेच वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. रोशन वाढई हा नागपुरच्या एका कंपनीत काम करतो तर देवदास बोंदरे हा सनफ्लॅग वरठी येथे काम करतो तक्रारकर्ता सोमेश्वर बोंदरे हा कामावर गेलाच नाही तरी वरील सर्व लोकांचे त्या हजेरी पटावर नावे आहेत. (शहर प्रतिनिधी)