शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर व पाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने या जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाले असून तरिही पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देवडेगाव ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार। गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणाºया टाकीत कुजलेले उंदीर व पाली आढळून आल्या आहेत. तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे हा प्रकार उघडकीस आला असून यातून ग्रामपंचायत किती बेजबाबदारपणे काम करीत आहे याची प्रचिती आली असून यामुळे मात्र गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जनतेला जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केला जातो त्या टाकीत शनिवारी (दि.९) सकाळी ७ वाजता काही नागरिकांनी बघितले असता ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या व अळी झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती उपसभापती व आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून देण्यात आली.सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने या जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाले असून तरिही पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे मात्र टाकीत उंदीर व पाली मरून त्यांना अळ््या लागल्या आहेत. त्या टाकीतील पाणी आजही वॉर्डातील लोक पिण्यासाठी वापरतात, हे विशेष.मात्र टाकीत मेलेले उंदीर व पाली आढळल्याचे कळताच काही महिलांनी घरातील स्वयंपाक फेकून दिल्याची माहिती आहे. शुक्रवारी (दि.८) गावात मंडई असल्याने चाट विक्रेत्यांनी बहुतेक याच टाकीच्या पाण्याचा वापर केला. यामुळे मात्र जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतेक मजुरांनी शेतात जाताना पिण्याचे पाणीही या टाकीतून घेतले.वेळीच हा पकार उघडकीस आला अन्यथा मेलेल्या उंदीर व पालीचे पाणी गावकऱ्यांना प्यावे लागले असते. विस्तार अधिकारी हे कधीच गावाला भेटी देत नाहीत, ते फक्त व्हिजीट बुक बोलावून व्हिजिट नोंद करीत असल्याचे गावकरी बोलत आहेत. अशात त्यांच्यावरही करावाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.वडेगाव येथे एक मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्या योजनेतून गावात पाणी पुरवठा केला जात आहे. जुनी टाकी कायमची बंद करण्याबाबत संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला सूचना दिल्या होत्या. मात्र पाणी पुरवठा बंद न करता त्याने लोकांना पिण्यासाठी पाणी देणे सुरूच ठेवले आहे.सरिता कटरे,ग्राम सेविका, वडेगाव-सडक--------------------सदर प्रकरण पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेऊन संबंधित कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करू.राजेश कठानेउपसभापती, पंचायत समिती, सडक-अर्जुनी

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण