पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिक तथा आवश्यक सेवेचा ठिकाणी ही अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही, करण्याचे आदेश दिल्यावरून आदेशाची अंमलबजावणी करण्याचे दृष्टिकोनातून तिरोडाचे ठाणेदार व शहर प्रशासनातर्फे कठोर पावले उचलण्यात येत आहे. १७ एप्रिलपासून स्थानिक प्रशासन व तिरोडा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. नगर प्रशासन व ठाणेदार यांनी कारवाई सुरू करून तिरोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संपूर्ण शहरातील मोक्याच्या जागेवर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व नागरिकांची कसून तपासणी व चौकशी करीत आहे. तिरोडा नगरपालिकेतर्फे शहरातील किराणा दुकान,फळ विक्रेते व भाजी व्यावसायिकांना सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे तसेच दुग्धजन्य पदार्थाचे दुकाने सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ६ ते ८ पर्यंत ठेवण्याचे निर्देश देऊन नगरपरिषद जवळ भाजी बाजारात ठोक व किरकोळ विक्रेत्यांमुळे होणारी मोठी गर्दी काढण्याकरता ठोक भाजीबाजार शहीद स्मारकासमोर दुपारी एक वाजता पर्यंत व चिल्लर बाजार नगरपरिषद जवळ दुपारी १ वाजता पर्यंत भरण्याचे निर्देश दिले आहे. पोलीस व नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे तिरोडा शहरात होणारी गर्दी कमी झाल्याने रस्ते सामसुम दिसून येत आहेत.
पोलिसांच्या कारवाईने रस्ते झाले सुनसान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST