शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे झाले जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:30 IST

कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रस्त्याची दैना, अपघातांच्या संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुकास्थळापासून भोसा ते पांजरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांना गटारांचे स्वरुप प्राप्त झाले असून यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अद्यापही याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्ती केली नाही. परिणामी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे.कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन वाहने चालवितांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामार्गे नोकरी करणारे, व्यावसायीक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात.त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावर भोसा-पांजरा, कट्टीपार-किकरीपार, बनगाव,आमगाव येथे मोठ्ठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन जावे लागते. याच ठिकाणी चार व्यक्तींचा या खड्यात पडून नाहक बळी गेल्याची घटना घडल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सुनील ब्राम्हणकर, हुलासराम बहेकार, श्रावण बागडे, शंकर कारंजेकर, लोकेश तरोणे, विनोद मटाले, रमेश क्षीरसागर, तिलकचंद मटाले, मंगरु मटाले, जनकराम ब्राम्हणकर, चिंतामन कारंजेकर,खुशाल वाढई, विनोद कारंजेकर, हिरामन फरकुंडे, मन्नालाल कांबळे, सुरजलाल शेंडे, खेमराज कोसरे,नवीन कोसरे, योगेश फरकुंडे, रमेश घराडे, रामकिसन कोल्हाटकर, वासुदेव ब्राम्हणकर, संजय मटाले, सुनील मटाले, मुन्नालाल मटाले, शंकर फुंडे, संजय मेश्राम, संजय शिवणकर, राजकुमार मटाले यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीचा अभावसार्वजनिक बांधकाम विभाग आमगावकडे खड्डे बुजविण्याकरिता किंवा डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करुन रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा