शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:48 IST

तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते.

ठळक मुद्देवन विभागाची हिरवी झेंडी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान आ.विजय रहांगडाले यांनी या प्रकल्पाचा मुद्दा केंद्र आणि राज्य शासनाकडून लावून धरुन या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्याने निमगाव प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.निमगाव प्रकल्प १९७२ ते ते २००६ पर्यंत रखडलेला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न केले होते. तसेच यासाठी भंडारा-नागपूर-भोपाल येथील कार्यालयात पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही या प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते. आ.रहांगडाले यांनी २०१५ पासून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कागदपंत्रासह पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वनमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे वांरवार पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र शासनाद्वारे वन विभागाला प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे एफआरए निधी ३१ कोटी रुपये राज्य मंत्रीमंडळाद्वारे केंद्र शासनाकडे भरण्यात आले. ज्यामध्ये वनविभागाची जमीन व झाडाच्या किंमतीचा सुद्धा समावेश करण्यात आल्या नंतरच राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला. निमगाव प्रकल्प हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० कि.मी.अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाचे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीकरिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता प्रत्यक्ष राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी यांनी आंबे नाल्याची २२ मे २०१९ रोजी पाहणी केली. निमगाव प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलावाच्या सुरक्षा भिंतीला पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाले आहे. रहांगडाले यांनी १० जून २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर केल्या.पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारबºयाच वर्षांपासून रखडलेला निमगाव सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यामुळे या तालुक्यातील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.याचा लाभक्षेत्रातील १८ गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवाय शेतकºयांना दुष्काळाशी दोन हात करण्यास याची मोठी मदत होणार आहे.वन्यप्राण्यांना पाण्याची सोयनिमगाव प्रकल्प हा बफर झोनमध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत असलेल्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. १७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळालेली असून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी