शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा सुरू होऊनही रस्ते दुरूस्ती प्रलंबितच

By admin | Updated: June 27, 2015 02:26 IST

घाटकुरोडा ते घोगरा व घोगरा ते मुंडीकोटा या उखडलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होवूनही करण्यात आली नाही.

मुंडीकोटा : घाटकुरोडा ते घोगरा व घोगरा ते मुंडीकोटा या उखडलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होवूनही करण्यात आली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना ये-जा करण्यासाठी मोठाच त्रास होत आहे.घाटकुरोडा ते घोगरा रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना व दुचाकी चालकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी-कधी रस्त्यावरचे खड्डे चुकविण्याच्या नादात गाडीचे संतुलन बिघवून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. घाटकुरोडा गाव वैनगंगा नदीच्या काठावर असून येथील रेती घाट सुरूच आहे. दररोज रेती भरून ओव्हरलोड ट्रक घोगरा रस्त्याने नागपूरकडे जातात. या रेतीच्या ट्रक धारकांना वेळेचे बंधन नाही. रात्री-बेरात्री ट्रक जात असतात. रस्त्याच्या कडेला ज्या व्यक्तींची घरे आहेत, त्यांची तर झोपच उडाली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून रस्ता जीर्ण झाला आहे. त्यामुळे सदर मार्ग अपघाताला आमंत्रण ठरत आहे.घोगरा ते मुंडीकोटा रस्ता संपूर्ण जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. पाच वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण आता डांबर कुठे गेला याचा पत्ताच नाही. मुंडीकोटा हे केंद्राचे ठिकाण असून येथे छोटी व्यापारपेठ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, रेल्वे स्थानक असून आठवडी बाजारही भरतो. अनेक गावातील लोकांचे येथे नेहमीच येणे-जाणे असते. या रस्त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी नेहमीच ये-जा करतात. तसेच रस्त्याच्या कडेला तीन राईस मिल आहेत. त्यामुळे ट्रकची नेहमीच वर्दळ असते. सदर रस्ता पूर्णत: जीर्ण झाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज कळत नाही व अपघाताची शक्यता ओढवते. तरी बांधकाम विभागाने याची तत्काल दखल घेवून रस्ता दुरूस्ती करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)