शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णावधी लोटूनही तो रस्ता ब्रम्हचारीच ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट ...

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची जनतेची तक्रार आहे. मात्र एका बड्या राजकारण्याशी संबंधित कंपनीला हे काम असल्याने एकही अधिकारी ढुंकून पाहात नाही. दिलेल्या मुदतीत रस्त्याचे बांधकाम तर पूर्ण झाले नाहीच याउलट पाच कोटींच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र अधिकारी नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सडक अर्जुनी पासून १० किमी अंतरावर शेंडा हे गाव आहे. यादरम्यान प्रजिमा क्र. २९ वर सहा किमी रस्ता बांधकामासाठी २८ कोटी ७३ लक्ष ८७ हजार १०२ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक होते. याचा करारनामा २२ कोटी ४ लक्ष ६० हजार ६६५ रुपयांमध्ये नागपूरच्या अताशा आशीर्वाद बिल्डर्स यांना १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. लगेच दुसऱ्या दिवशी कार्यारंभ आदेश देण्यात आला. रस्ता बांधकाम पूर्ण होण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२० ही होती. अगदी कार्यारंभ झाल्यापासूनच हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची जनता व लोकप्रतिनिधींची तक्रार होती. मात्र हे कंत्राट गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंधित नागपूरच्या एका बड्या राजकारण्याशी निगडित बांधकाम कंपनीला आहे. यामुळेच कुणीही अधिकारी जनतेच्या तक्रारी व रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुन्या मंजूर अंदाजपत्रकात काँक्रिट रस्त्याची जाडी ४५० मिमी होती. कंत्राटदाराने राजकीय बळाचा वापर करून नावीन्यपूर्ण बाब म्हणून व्हाइट टॉपिंग काँक्रिट या संकल्पनेनुसार २५० मिमी एवढी तयार केली. सदर रस्त्याची जाडी २०० मिमी कमी करून पावसाळ्यात घरात पाणी शिरू नये हे चुकीचे कारण दर्शवून अतिरिक्त बाबीचा प्रस्ताव दाखल केला. या ५ कोटी ८ लक्ष ५९ हजार ९३९ रुपयांच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावास नागपूरच्या साबां (प्रादेशिक) विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १९ जानेवारी रोजी मान्यता दिली. विशेष उल्लेखनीय म्हणजे घरात पाणी शिरते अशी कुणाचीही तक्रार नव्हती. कंत्राटदाराने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे केल्याचा आरोप आहे.

...........

५० टक्केही काम पूर्ण नाही

हे बांधकाम सुमारे पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. यावर कुठल्याच प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन नाही. हे बांधकाम गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ यांचे अखत्यारित सुरू आहे. बांधकामाची गुणवत्ता नाही. काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. कासवानेही पावणे तीन वर्षांत हा सहा किमीचा प्रवास पूर्ण केला असता मात्र एवढ्या कालावधीत रस्त्याचे अद्याप ५० टक्केही काम पूर्ण होऊ शकले नाही. कंत्राटदाराच्या या कासव गतीचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने हा रस्ता पूर्ण झाला नाही तर, जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. राज्य सरकारने चौकशी समिती नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी परशुरामकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

300721\img-20210730-wa0002.jpg

हाच तो अपूर्णअवस्थेत असलेला सडक अर्जुनी-रेंगेपार-शेंडा रस्ता