शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

सडक अर्जुनीत एमआयडीसी प्रक्रियेला होणार सुरुवात

By admin | Updated: August 13, 2016 00:07 IST

आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेल्या तालुक्यांमध्ये सडक अर्जुनीचा समावेश आहे.

राजकुमार भगत सडक अर्जुनी आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेल्या तालुक्यांमध्ये सडक अर्जुनीचा समावेश आहे. अशा तालुक्याचा बदल घडविण्यासाठी औद्योगिक विकास महत्वाचा आहे. त्याकरिता सडक अर्जुनी तालुक्यात एमआयडीसी निर्माण होण्याच्या हालचालींना वेग येत आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्याकडे त्यासाठी सूचना करून पाठपुरावा करायला सुरुवात केल्याची माहिती आहे. सडक अर्जुनी तालुक्याची निर्मिती १५ आॅगस्ट १९९२ ला झाली असून सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे असून ६४ ग्रामपंचायती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या १ लाख १५ हजार ५९४ आहे. सदर तालुका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असून या तालुक्याचा आतापर्यंत कोणताही विकास झाला नसून आजपर्यंत या तालुक्यात शेती हाच एक पर्याय आहे. त्यामध्येही धानाची शेती असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्यामुळे हथबल झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यात औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे तालुक्यातील मजुर वर्ग बेरोजगार आणि सुशिक्षीत बेरोजगार शहरी भागात कामाच्या शोधासाठी नियमित जात असतात. धानाचा हंगाम वगळता तालुक्यातील मजुर वर्गाला काम नाही. त्यामुळे तालुक्यातील आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. तालुक्यात एमआयडीसी झाल्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बाहेरगावी जाणारा मजुर ही आपल्या गावी काम असेल तर बाहेर जाणार नाही. अनेक बेरोजगार लोकांना काम मिळेल. आणि साखर कारखाना असेल तर उस लागवड होऊन शेतकऱ्यांना पन जास्त पैसे मिळतील. दाळ मिल असेल तर त्याचा फायदा शेतकरी मजुर आणि व्यवसायीकांना होईल. याकरिता एमआयडीसीची नितांत गरज असल्याचे दिसून येते. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे सडक अर्जुनी तालुक्याचे असल्यामुळे त्यांनी कोणताही पक्षभेद न ठेवता सडक अर्जुनीच्या सारख्या ग्रामीण भागातील विकासाकरिता एमआयडीसीच्या उभारणीकरिता प्रयत्न करावे, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून केली जात आहे. एमआयडीसी तालुक्यात सुरु होण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले प्रयत्न करीत आहे. त्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केल्याची माहिती आहे. त्याकरिता जागेचा शोध घेणे सुरु आहे. - कविता रंगारी सभापती, पंचायत समिती सडक अर्जुनी एमआयडीसीशिवाय सडक अर्जुनी तालुक्याचा विकास अशक्य आहे. त्याकरिता तालुक्यात सडक अर्जुनी- गोंदिया रोडवरील खजरी ते वृंदावनटोला या परिसरातील जागा सोईस्कर होवू शकते. - राजेश नंदागवळी माजी समाजकल्याण सभापती. जि.प.