शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सडक-अर्जुनी तालुका एमआयडीसीपासून वंचित

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे.

सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव या सर्वच तालुक्यांत एमआयडीसी करिता शासनाने जागा उपलब्ध करुन तेथे काही उद्योगही सुरू आहेत. मात्र सडक-अर्जुनी तालुका मागील २० ते २५ वर्षापासून एमआयडीसीपासून वंचीत आहे. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्याची निर्मिती सुमारे २० ते १५ वर्षापुर्वी झाली. मात्र अजूनही या तालुक्याला शासनाने एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. आज तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व रेल्वेमार्ग असूनही या तालुक्याला शासनाकडून वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यात २० वर्षापुर्वी एमआयडीसी उभारली गेली असली तर तालुक्यासह जिल्हा तसेच बाहेरील उद्योजकांनाही या जागेचा फायदा झाला असता. शिवाय यातून तालुक्यातील सुशीक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले असते. मात्र आज या तालुक्यातील बेरोजगार पोटाची खळगी भरण्याकरिता घरदार सोडून बाहेरगावी धाव घेत आहेत. तर कित्येकांना काम मिळत नसल्याने निराश होऊन घरी परतावे लागते. करिता संबंधित अधिकाऱ्यांनी सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दयावी व तेथे काही उद्योग सुरू करण्याची गरज आहे. यासाठी श्रीराम नगरच्या बाजूला एमआयडीसीची जागा शासनाने उपलब्ध करुन दयावी अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे, हरिष कोहळे, गायत्री इरले यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. (वार्ताहर)