शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

सडक अर्जुनीची अवैध रेती गोरेगावात

By admin | Updated: October 6, 2016 00:58 IST

सडक अर्जुनी तालुक्यातून अवैध रेती गोरेगाव तालुक्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.

तहसीलदाराची कारवाई : पाच ट्रॅक्टरवर ५२५०० रुपयाचा दंड दिलीप चव्हाण गोरेगावसडक अर्जुनी तालुक्यातून अवैध रेती गोरेगाव तालुक्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. तरीही महसूल विभाग कारवाई करीत नाही. सडक अर्जुनी तालुका महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. तर गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी पाच ट्रॅक्टरवर कारवाई करीत ५२ हजार ५०० रुपये दंड ठोठावला आहे. सडक अर्जुनी येथून विना रॉयल्टी रेतीचे अवैध उत्खनन करुन ती रेती गोरेगावात विकली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्री १२ च्या नंतर ट्रॅक्टरने रेती येत आहे. हा प्रकार राजरोषपणे सुरू आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोचा भूर्दंड बसत आहे.दरदिवशी रात्रीच्या वेळी २५ ते ३० ट्रॅक्टरने रेती येत असल्याने त्यांच्यावर येथील ट्रॅक्टर चालक-मालक असोसिएशनची नजर होती. ४ सप्टेंबर २०१६ रोजी रात्रीला रेती भरुन आलेल्या ट्रॅक्टरला गोरेगावचे नायब तहसीलदार एस.एम. नागपुरे, कोतवाल पुरुषोत्तम रहांगडाले, कोतवाल विकास चाचेरे, कमलेश बघेले यांनी ट्रॅक्टर असोसिएशनच्या मदतीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ट्रॅक्टर मालक भागेश्वर चव्हाण रा. बोथली (ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी ६९६६, ट्रॉली क्रमांक एम.एच. ३५ एफ १९३४), मुन्ना अनंतरराम वरखडे रा. बक्कीटोला (एमएच ३५ जी ६२३२, ट्रॉली क्रमांक नाही), गजानन परशुरामकर रा. खाडीपार (एम.एच.३५ जी ७५७७, ट्रॉली क्रमांक एमएच ३५ जी.पी. ४८२५), गजानन परशुरामकर रा. खाडीपार (ट्रॉली क्रमांक एम.एच. ३५/६२६५), मेघनाथ सखाराम उंदिरवाडे ( ट्रॅक्टरला नंबर नाही) या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करण्यात आली.२४६ रेती माफियांवर कारवाई नऊ महिन्यापूर्वी तहसीलदार कल्याणकुमार डहाट ( १ जानेवारी २०१६) गोरेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून रुजू झाले. रुजू होताच तहसीलदार डहाट यांनी २४६ ट्रॅक्टर मालकावर कारवाई केली. या कारवाईतून शासनाच्या तिजोरीत १८ लाख २२ हजार २०० रूपये महसूल जमा केला. तहसीलदाराच्या दहशतीमुळे ट्रॅक्टर मालकांनी अवैध काम बंद केले. ५२५०० रुपये दंडअवैध रेती विक्रीस आणणाऱ्या त्या पाच ट्रॅक्टर मालकावर प्रत्येकी १०,५०० प्रमाणे दंड ठोठावण्यात आला आहे.एकूण ५२,५०० रुपये महसूल विभागात जमा करण्यात आले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातून दरदिवशी रात्रीच्या वेळेस विना क्रमांकाचे ट्रॅक्टर गोरेगाव परिसरात रेतीची तस्करी करतात. मात्र आरटीओ कारवाई शुन्य आहे.