शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:43 IST

येथील नगरपंचायतमध्ये अद्यापही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार आहे. तर गावातील विकास कामे आणि स्वच्छतेकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देसिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट : प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर भार

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील नगरपंचायतमध्ये अद्यापही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार आहे. तर गावातील विकास कामे आणि स्वच्छतेकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे.पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गृह गावातील ही नगर पंचायत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सडक-अर्जुनी नगरपंचायतच्या निर्मितीला तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही नगरपंचायतची अवस्था अतिशय बिकटआहे. बऱ्याच दिवसांपासून शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेंडा रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून नाली नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचते.दुसरीकडे नगरपंचायत प्रभाग क्रं. १४ मधील मनोहर डोंगरवार ते संजय प्रधान यांचे घरापर्यंत १५० मी. सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्ता बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर आहे. मात्र सदर रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रस्ता बांधकामासाठी वापरलेली गिट्टी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे. या सिमेंट रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी अधिकाऱ्यांनी केली नाही. भर पावसाळ्यात या रस्त्याचे बांधकाम सुरु करण्याचा नेमका उद्देश काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.