शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन व्यवसाय ठप्प होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 00:14 IST

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात. परंतु सध्या चाऱ्याची टंचाई व दुधाचे अत्यल्प भाव यामुळे परिसरातील..

समस्या चाऱ्याची : पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड रावणवाडी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात. परंतु सध्या चाऱ्याची टंचाई व दुधाचे अत्यल्प भाव यामुळे परिसरातील अनेक गावात पशुपालन व्यवसाय डबघाईस आला आहे. दूध उत्पादनाचा खर्चाच्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या दैनंदिन गरजांचा खर्च भागवितात. मात्र सध्या गाई-म्हशींच्या किंमती ३० ते ६० हजार रूपयांपर्यंत आहेत. दुष्काळ व महागाईच्या संकटाचा फटका या मुक्या जनावरांनाही बसत आहे. पशुखाद्य, वैरण-चारा, जनावरांचे आजार, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत खासगी डॉक्टरांकडून उपचार करणे आदी समस्यांमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी त्रस्त होवून गेले आहेत. या समस्यांमुळे दुग्ध उत्पादनात मोठ्याने घट झाली आहे. हवे तसे दूध नागरिकांना उपलब्ध होत नाही. भेसळ दुधाने दैनंदिन गरजा भागवावे लागत आहे. मागील वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे व यावर्षी विलंबाने आलेल्या मान्सूनमुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यामधून पशुपालक दुग्ध उत्पादकांना कवडीची मदत मिळत नाही. अनेक योजनांपासून शेतकरी अनभिज्ञच आहेत. अनेक योजनांची त्यांना माहितीच होत नाही. दुधाळ जनावरांसाठी लागणाऱ्या पौष्टीक आहाराचे दर गगणाला भिडले आहेत. त्या तुलनेत दुधाचे दर मात्र फारच कमी आहेत. अशात हा पिढोनपिढ्यांचा व्यवसाय करावा तरी कसा? असा प्रश्न दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (वार्ताहर)