शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: December 8, 2014 22:37 IST

तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते.

आमगाव : तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. निधी नाहीच्या नावावर हात वर करून अधिकारी व नेते वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवित असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. आमगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. वेळेवर जे मिळेल त्या साधनाने येऊन काम करून प्रत्येक जन निघून जातात. यात मोठी गैरसोय शाळकरी मुलांची होत आहे. मात्र प्रशासन व स्थानिक नेते मुकबधीर होऊन बसले आहेत. काही गावांना जाणारे मार्ग दहा ते वीस वर्षांपासून दुरूस्ती करणापासून वंचित आहेत. फक्त निधी नाही, नियोजनाअभावी कामे थांबली आहेत, अशी बतावणी करून वेळकाढूपणाचे धोरण सुरू आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मग सतत ५ ते १० वर्षांपासून तालुक्याला रस्ते दुरूस्तीसाठी निधी शासनाकडून का पाप्त झाला नाही? किंवा निधीसाठी पाठपुरावा कधीच का केला गेला नाही किंवा निधी आला तर तालुक्यातील रस्त्यावर अन्याय का झाला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. नागरिकांना नगरात येताना जो त्रास होतो त्याचा पाठपुरावा अजूनपर्यंत झाला नाही. आमगाव, कुंभारटोली, बिर्सी, जामखारी, तिगाव, कोपीटोला पुढे मांडोबाई, आमगाव, किडंगीपार, शिवणी, चिरचाळबांध, सितेपार, भजेपार, कालीमाटी-सुपलीपार, मोहगाव कार्तुली, कालीमाटी ते मुंडीपार, भोसा, करंजी, आमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरीपुढे मुंडीपार अशाप्रकारे जवळपास २५ ते ३० गावांना जाणाऱ्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थान आहे. जिल्हा परिषद सदस्य टुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, उषा हर्षे, संगीता दोनोडे यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारे रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी भरून गेले आहेत. फक्त जिल्हा परिषदेचे कोणते लाभ आपणाला किंवा आपल्या चेलेचपाट्यांना कसे मिळतील, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. बंधारे, खळीकरण, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मिळविण्याकरिता अनेक जि.प. सदस्य व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या क्षेत्राचे कामे मिळतात. मात्र त्यांच्या क्षेत्रातील रस्त्यांचे डांबरीकरण होण्याकरिता ठोस उपाय अजूनपर्यंत झाले नाही. फक्त नगरातील कामठा चौकात आमगाव, शंभुटोला, ननसरी मार्गांचे डांबरीकरण व्हावे, याकरिता सर्वदलीय उपोषण करण्यात आले. मात्र तेथेसुध्दा काम पूर्णत्वास अजूनपर्यंत गेले नाही. एकंदरीत आज सत्ता संपूर्ण एका पक्षाची आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे आता तरी तालुक्यातील ज्या प्रमुख गावांना जाणाऱ्या मार्गाची जी दुर्दशा झाली आहे, त्यांचे डांबरीकरण अत्यंत गरजेचे आहे. जवळच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्याने आचार संहितेचा फटका नाकारता येणार नाही. त्यामुळे लवकर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)