शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

प्रवासी निवाऱ्यांची मागणी मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते. पण, जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. ...

प्रवासी निवाऱ्यांची मागणी

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते. पण, जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते. प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व कीटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एटीएम होत आहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रांवर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही.

झाडे जगवा उपक्रम कागदोपत्री

पांढरी : ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवून कंत्राटदाराने झाडांची लागवड केली, परंतु त्यांची जोपासना न केल्याने कित्येक झाडे वाळली असून, उर्वरित मरण्याच्या अवस्थेत आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

गोंदिया : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. अनेकदा लाेकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही दुर्लक्ष आहे.

बनगाव येथे घाणीचे साम्राज्य

आमगाव : बनगाव येथील वाॅर्डमधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

गोरेगाव : गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्याप बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

लाभापासून कर्मचारी वंचित

सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला; परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ देण्यात आला नाही.

हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त

गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे अवागमन होत असून, त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशांवर कारवाईची गरज आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प

गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

देवरी ते आमगाव महामार्गाचे बांधकाम रखडले

आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहेत. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, याबाबत या बांधकामावर नियंत्रण असणारा विभाग निद्रावस्थेत दिसतो. त्यामुळे संपूर्ण बांधकाम रखडले असून, रस्त्यांलगत नाल्यांचे बांधकामही रखडले आहे.