शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

सहापैकी पाच नातलगांनी त्यांच्या नावे झालेली वडिलोपार्जित जमीन विक्री केली. मात्र ज्या भावाने जागा

गोंदिया : सहापैकी पाच नातलगांनी त्यांच्या नावे झालेली वडिलोपार्जित जमीन विक्री केली. मात्र ज्या भावाने जागा विक्री केली नाही, त्या भावाचे व त्याच्या आईचे नाव सातबारा रेकार्डवरून कमी करण्यात आले व ज्यांनी जागा विक्री केली त्यांचे नाव पुन्हा त्या रेकार्डवर चढविण्यात आले. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत केलेला अर्जसुद्धा गहाळ झाला. असा मोठाच गलथान कारभार आमगाव तालुक्याच्या तहसील कार्यालयात सुरू आहे. आमगाव तालुक्याच्या सरकारटोला येथील रहिवासी पवन विठोबा मानकर यांच्या मालकीच्या जमिनीवर पूर्वीपासून त्यांची जोत आहे. तलाठी साजा-७ अंतर्गत गट क्र-३३०, आराजी ०.२३ हे.आर. हक्क वर्ग-१, लगान ०.३५ प्रमाणे कास्तकारी जमीन त्यांना वडिलोपार्जित हिस्स्यातून मिळाली. त्यांचे नातलग हिरालाल मानकर, प्रेमलाल मानकर, रोशनलाल मानकर, गेंडलाल मानकर व तुरसा रामलाल मानकर यांचे नाव शासकीय सातबारा रेकार्डमध्ये नोंद होते. हळूहळू त्यांनी आपल्या हिस्स्यातील जमीन विक्री केल्यावर त्यांची नावे सातबाऱ्यावरून कमी करण्यात आले. परंतु पवन मानकर यांचे नाव जमीन विक्री केले नाही म्हणून कायम होते. परंतु कालांतराने सदर पाचही जणांचे नाव सातबाऱ्यावर समाविष्ट करण्यात आले व पवन मानकर व त्यांच्या आईचे नाव कापण्यात आले. ही घोळचूक दफ्तर दिरंगाईतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे त्यांना पीक नुकसान भरपाईचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे त्यांनी तलाठ्यांकडे चौकशी केल्यावर ही घोळचूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी २८ एप्रिल २०१४ रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली. परंतु तत्कालीन तहसीलदार, तलाठी व नातलग यांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याने त्यांचे व त्यांचा आईचे नाव सातबारावरून कमी करण्यात आले, असा आरोप पवन मानकर यांनी केला आहे. पवन मानकर व सुरजा विठोबा मानकर या मायलेकांचे नाव सातबाऱ्यावर पूर्वी कायम होते. तसेच नातलगांचे नाव कमी झाल्याची नोंद होती. परंतु नातलगांनी आपल्या वाट्याची जमीन विक्री केल्यावर नवीन सातबारा रेकार्डवर मायलेकाचे नाव गायब आहे. प्रकरणाची सत्यता जाणण्यासाठी ११ जानेवारी २०१६ रोजी संघटनेतर्फे त्यांनी माहिती अधिकारांतर्गत तहसीलदार शक्करवार यांच्याकडे अर्ज केला. मात्र त्यांनी तलाठी साजा-७ ज्या नायब तहसीलदाराकडे येतो त्यांना द्या, असे सांगितले. मात्र नायब तहसीलदारांना दिल्यावर त्यांनी सदर अर्ज गायब झाल्याचे सांगून अर्जाच्या झेरॉक्स प्रति मागितल्या. त्या दिल्यावरही तलाठ्यांकडून माहिती येण्यास आहे, असे सांगून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान शक्करवार यांची बदली झाली व नवीन तहसीलदार म्हणून राठोड रूजू झाले. मात्र त्यांनीही माहिती अधिकारांतर्गत माहितीची मूळ प्रत पाठवित असल्याचे कळवून मूळ प्रत पाठविलीच नाही व दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे पवन मानकर यांना मोठाच मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी २ जून २०१६ रोजी जिल्हाधिकारी व आयुक्त नागपूर यांना केली आहे. सदर माहिती महाराष्ट्र लालबावटा शेतकरी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)