शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचा अधिकार बनले पोट भरण्याचे साधन

By admin | Updated: June 22, 2015 00:42 IST

शासनाने चांगल्या उद्देशाने माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आणला.

दुरूपयोग : अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकारगोंदिया : शासनाने चांगल्या उद्देशाने माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आणला. परंतु काही व्यक्तीव्दारे माहिती अधिकार कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासून या कायद्याचा दुरूपयोग केला जात आहे. शासनाने उदात्त हेतू बाळगून शासन प्रणालीतील भ्रष्टाचारावर अंकुश बसावे आणि झालेला भ्रष्टाचार उघड व्हावा या हेतूने माहितीचा अधिकार सन २००५ साली अमंलात आणला. शासनाच्या वतीने सामान्य माणसाला शासनाच्या विविध विभागातील चालत आलेला कारभार माहित व्हावा तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर वर्चस्व निर्माण व्हावे, कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता यावी हा प्रामाणिक उद्देश बाळगून कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र काही नागरिक तसेच कार्यकर्ते या अधिकाराचा दुरूपयोग करून पैसे कमविण्याचा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. माहितीचा अधिकार हा कायद्याचा आधार घेत काही कार्यकर्त्याचे पोटभरण्याचे साधन झाले आहे. विनाकारण अधिकाऱ्यांना नाहक वेठीस धरून वेळप्रसंगी पैशांची मागणी करून माहिती अधिकार कायद्याला गालबोट लावण्याचे काम काही मंडळी करीत असल्याने चांगले काम करणाऱ्यांवरही दडपण येऊन त्यांच्या कार्यशैलीत परिणाम पडत आहे. सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अविरत लढा देऊन माहितीचा अधिकार कायदा पास करण्यासाठी शासनाला भाग पाडले. या कायद्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडून आला. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जनतेत समाधान तर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग सार्वजनिक हितासाठी व शुध्द सकारात्मक हेतूने होणे आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीत अनेकांकडून असे होताना दिसून येत नाही. काही कार्यकर्ते वगळले तर बहुतांश जणांकडून या कायद्याच दुरूपयोग होतांना दिसतो. (तालुका प्रतिनिधी)