शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी

By admin | Updated: August 25, 2016 00:03 IST

गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

देवरीत तीन एकर जागा उपलब्ध : मशीन खरेदीसाठी ७.५० कोटी मंजूरगोंदिया : गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी ५ एकर जागेची मागणी असताना सध्या ३ एकर जागा देवरी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ७.५० कोटींचा निधीही मंजूर झाल्याचे समजते.या उद्योगामुळे अनेक दिवसांपासून ओस पडलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील देवरी एमआयडीसीत उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून भविष्यात आणखी काही उद्योग येण्याची शक्यता आहे. देवरी एमआयडीसीमध्ये या उद्योगासाठी सध्या केवळ ३ एकर जागा मिळाली असली तरी त्या जागेलगत जवळपास ४ एकरची जागा अजून उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया उद्योग केंद्राचे तत्कालीन जिल्हा महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते. अजूनही त्यांचे या प्रकल्पाच्या कामावर लक्ष आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर देवरी एमआयडीसी मध्ये इतर प्रकल्प येणे सोयीस्कर होईल, अशी आशा भारती यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)- गोंदियातील तांदूळ विदेशातविशेष म्हणजे हा तांदूळ प्रक्रिया प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहभागातून चालविला जाणार आहे. त्यासाठी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातील ५० शेतकऱ्यांचा या उद्योगात सहभाग राहणार आहे. या प्रकल्पात दररोज ८ टन तांदळावर प्रक्रिया केली जाणार आहे. याच ठिकाणी तांदळाची पॅकेजिंग केली जाईल. तसेच येथील तांदळात गुणवत्ता जपून तो तांदूळ विदेशात पाठविला जाणार आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बंगलोर येथील प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच म्हैसूर व तंजावर येथील तांदूळ प्रक्रिया उद्योग पाहण्यासाठी पाठविण्यात आले होते. दोन जिल्ह्यांचा कारभार पाहतात दोन अधिकारीउद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीकडे अधिकारीच नाहीत. गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमधील औद्योगिक वसाहतींचा संपूर्ण कारभार नागपूर येथील उद्योग विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातूनच पाहिल्या जातो. केवळ आवंटित केलेल्या प्लॉट्समधील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि उद्योगांना सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही जिल्हे मिळून गोंदियात एकमेव कार्यालय आहे. या कार्यालयातही केवळ एक उपअभियंता आणि एक सहायक अभियंता असे दोन अधिकारी आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.