शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातून होतेय जिल्ह्यात तांदळाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

बऱ्याच राइस मिलर्सने भरडाईसाठी तांदळाची उचल केलेली नाही, तर काही राइस मिलर्स भरडाईसाठी धानाची उचल करीत आहे, पण त्याची भरडाई न करता, तो धान परस्पर विक्री करतात. भरपूर लाभार्थी रेशनच्या तांदळाची विक्री करतात. हा तांदूळ घेणारे व्यापारी महाराष्ट्रात सर्वत्र सक्रिय आहेत. हाच तांदूळ ते १२ ते १४ रुपये दराने माेठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. पुढे भरडाईसाठी करार केलेले काही राइस मिलर्स हा तांदूळ खरेदी करून ते केवळ शासनाने दिलेल्या कट्ट्यांमध्ये भरून तो तांदूळ शासनाकडे जमा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रेशनचा तांदूळ पुन्हा रेशनच्या दुकानात हा प्रकार आता जिल्हावासीयांसाठी नवीन राहिलेला नाही. सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर, या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद लागला होता. मात्र, शुक्रवारी यवतमाळ पोलिसांनी नांदेड येथून तांदूळ घेऊन येणारा एक ट्रक पकडला. हा ट्रक गोंदिया येथील तांदूळ विक्रेत्याकडे येणार होता. यात रेशनचा तांदूळ असल्याचे बोलले जाते. ते चौकशीअंती स्पष्ट होईलच. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून जिल्ह्यात रेशनच्या तांदळाची तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्हा तांदूळ उत्पादकांचा जिल्हा आहे, तर जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची खरेदी केली जाते. त्यानंतर, या तांदळाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर, हा तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाना पुरवठा केला जातो, पण मागील दोन-तीन वर्षांपासून भरडाईनंतर तांदळाचा पडता येत नसल्याने भरडाईसाठी शासनाशी करार केलेल्या राइस मिलर्सला ते परवडत नाही. ही बाब त्यांनी अनेकदा शासनाच्या निदर्शनासही आणून दिली. एवढेच नव्हे, तर टेस्टिंग मिलिंगचीही मागणी केली, पण शासनाने ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळेच बऱ्याच राइस मिलर्सने भरडाईसाठी तांदळाची उचल केलेली नाही, तर काही राइस मिलर्स भरडाईसाठी धानाची उचल करीत आहे, पण त्याची भरडाई न करता, तो धान परस्पर विक्री करतात. भरपूर लाभार्थी रेशनच्या तांदळाची विक्री करतात. हा तांदूळ घेणारे व्यापारी महाराष्ट्रात सर्वत्र सक्रिय आहेत. त्यानंतर, हाच तांदूळ ते १२ ते १४ रुपये दराने माेठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. पुढे भरडाईसाठी करार केलेले काही राइस मिलर्स हा तांदूळ खरेदी करून ते केवळ शासनाने दिलेल्या कट्ट्यांमध्ये भरून तो तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यामुळेच रेशनचा तांदूळ पुन्हा रेशनच्या दुकानात अशी प्रक्रिया चालत असल्याची माहिती आहे.

 रेशनच्या तांदळाची विक्री करणे गुन्हा - रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी दिला जाणारा रेशनचा तांदूळ हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिला जातो; पण बरेच लाभार्थी गरजेपुरता तांदूळ ठेवून उर्वरित तांदळाची विक्री करतात. तांदळाची विक्री करणे हा गुन्हा, तसेच या लाभार्थ्यांकडून हा तांदूळ घेणाऱ्यांनासुद्धा तेवढेच दोषी मानले जाते. मात्र, यानंतरही रेशनच्या तांदळाचा गोरखधंदा सुरूच आहे. 

आंध्र प्रदेशात चालला तांदूळ- आंध्र प्रदेशात रेशनच्या तांदळाला चांगला भाव मिळत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. मात्र, तांदूळ पाठविताना आठ ते दहा नाक्यांवर पैसे मोजावे लागतात, तर थोडी जोखीमही आहे. त्यामुळे या तांदळाची वाहतूक ही रात्री १२ वाजेनंतरच केली जात आहे. यासाठी मोठी सेटिंग करावी लागत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. 

नियंत्रण कुणाचेरेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना आतापर्यंत अनेकदा कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वीच नागपूर येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, यानंतरही या प्रकाराला अद्यापही चाप बसलेला नाही. रेशनच्या तांदळाची विक्री सर्रासपणे सुरूच असून, नांदेडसह इतर जिल्ह्यांतून तांदूळ येत असून, यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याची माहिती आहे. 

बड्या आसामींचा समावेश- रेशनचा तांदूळ खरेदी करणे व तो सुरक्षित स्थळी पाठविणे हे मोठे जोखमीचे काम आहे. हे काम एकट्यादुकट्याचे नसून यात काही बड्या आसामींचा समावेश आहे. त्यामुळे ते हा तांदूळ नाक्यावरून सुरक्षितपणे बाहेर पाडण्याची मुख्य भूमिका पार पाडत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Smugglingतस्करी