शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ उद्योग होरपळतोय

By admin | Updated: May 22, 2015 01:59 IST

मागील सात वर्षांपासून विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य दर मिळत नाही.

गोंदिया : मागील सात वर्षांपासून विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य दर मिळत नाही. यामागे शासकीय समर्थन दरावर शासनाद्वारे खरेदी धानाची मिलिंग न होणे, हे कारण आहे. त्यामुळे राज्य शासनाला दरवर्षी २० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. या वर्षांत जवळपास २०० कोटी रूपयांचे धान सडले, त्याला लिलावाद्वारे ३५ कोटी रूपयांत विक्री करण्यात आले. त्यामुळे शासनाने तांदूळ उद्योगाला चालना द्यावी, अशी मागणी गोंदियाच्या राईस मिलर्स असोसिएशनने केला आहे.मिलिंग न होणे झाल्यावरही अत्यंत कमी दर व कमी परिवहन दरामुळे राईस मिलर्सचे मोठेच नुकसान होत होते. मागील शासनाने कधीकधी मिलिंग दरात वाढ केली होती, परंतु ते अपयशी ठरले. भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना भाजप नेत्यांनी मागील सात वर्षांत राज्य शासन व प्रसार माध्यमांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. सन २०१४-१५ मध्ये भाजपचे शासन आले. ज्या नेत्यांनी हे विषय विपक्षात राहून उचलून धरले होते, तेच आता सत्तेत आहेत. त्यामुळे राईस मिलर्स असोसिएशनने आपल्या मागण्या त्यांच्याकडे पाठविल्या आहेत. राईस मिलर्स असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रानुसार, नवीन शासनाने तत्काल अन्न व नागरी पुरवठा विभागात सतत राईस मिलर्स, सेवा सहकारी संस्था, शासकीय एजंसी व फूड कार्पोरेशनसह बैठका घेवून शेतकरी व उद्योगाच्या हितात कार्य केले. धान मिलिंग दर ४० रूपये प्रतिक्विंटल केले, शेतकऱ्यांना २५० रूपये प्रतिक्विंटल बोनस घोषित केले व धान खरेदी सुरू ठेवली, धान मिलिंग कामाचे परिवहन दर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निविदेद्वारे प्राप्त दरांना मान्यतेसाठी प्रस्तावित केले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्याला नुकसान होणार नसून शेतकीर व उद्योग-मजूर लाभान्वित होतील. मिलिंग व परिवहन दर सात वर्षांपासून विवादास्पद आहेत. उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. मागील अनेक दिवसांपासून या विषयांवर अशा प्रकारच्या निराधार चर्चा केली जात आहेत. परंतु राईस मिलर्सकडील तांदूळ मागील १६ वर्षांपूर्वीचे आहे. ते सदर तांदूळ द्यायला तयार आहेत, परंतु फूड कोर्पोरेशनच्या असहयोगामुळेच सदर तांदूळ बाकी आहेत. (प्रतिनिधी)राईस मिसर्लकडे २.७५ लाख क्विंटल तांदूळ बाकीचराज्य शासनाने धान व तांदळाला डी-सेंट्रलाईझ प्रोक्युरमेंट (डीसीपी) केले. त्यामुळे छत्तीसगड राज्याप्रमाणे येणाऱ्या सीझनमध्ये राज्य शासन स्वत: धान व तांदळाची खरेदी करेल. त्यात एफसीआयची गरज भासणार नाही. हे शेतकरी व उद्योगाच्या हिताचे ठरेल. राज्यात एफसीआयद्वारे राज्य शासनाला तांदूळ गुण नियंत्रक न दिल्यामुळे मागील वर्षी जवळपास २.७५ लाख क्विंटल तांदूळ (४८.१५ कोटींचे) राईस मिलर्सच्या जवळच असून स्वीकृत होवू शकले नाही. डीसीपी प्रक्रियेमुळे सदर तांदूळ निश्चितच राज्य शासन स्वीकृत करेल, अशी आशा असोसिएशनला आहे.