शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमध्ये येणार क्रांती

By admin | Updated: February 16, 2017 00:50 IST

जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

सी.एल. पुलकुंडवार : व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पाठविले पत्र गोंदिया : जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती घडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात डिजिटल स्कूल, अध्ययन कुटी व प्रगतीशील अभियानानंतर आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारद्वारे जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, गावातील मुलांची शंभर टक्के नोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना टिकवून ठेवणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळा निर्माण व दुरूस्तीदेखभाल करणे, शिक्षकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आदी महत्वपूर्ण कामांची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीद्वारे सांभाळली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षकांद्वारे विविध नवीन उपक्रम आयोजित केले जात आहेत. यापैकीच एक म्हणजे लोकसहभागातून शाळा डिजिटल अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकतर शाळा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत डिजिटल होत आहेत. अनेक शिक्षकांद्वारे व्ययक्तीक स्तरावर, विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, जिल्ह्यातील शाळांच्या निरीक्षणप्रसंगी अनेक शाळांतील विद्यार्थी योग्यरित्या पाठ्यपुस्तके वाचू शकत नाही, ही बाब समोर आली. विद्यार्थी ज्या वर्गात शिकतात, त्या वर्गाच्या पुस्तके त्यांना योग्यरिता वाचता येणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी यायला हवी. लहान बालकांमध्ये जर भाषा विषयाचे आकलन करण्यात आले नाही तर इतर सर्व विषयांचे आकलन करण्यात समस्या होवू शकते, सर्व विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने सक्षम होण्यात बाधा येवू शकते. आपल्या बालकांना चांगले शिक्षण देवून त्यांना सक्षम बनविणे, मुलगा आपल्या पायांवर उभा राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनावा, अशी सर्व आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु बालकांच्या शैक्षणिक विकासाविना कोणत्याही प्रकारच्या भौतिक विकासाचे महत्व नाही. यासाठी आई-वडिलांनी आपल्या बालकांच्या अभ्यासाप्रती जागृत राहणे गरजेचे आहे, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले. (प्रतिनिधी)