लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी जवळ झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी वेळीच घेतला. त्यामुळे पाच बालकांना नवजीवन मिळणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील देवरीजवळ १८ एप्रिलला एक अपघात झाला. या अपघातात रेव्यानी आरती रहांगडाले (वय ६) ही बालिका जखमी झाली होती. तिच्या मेंदूला जखम (ब्रेन एंज्युरी) झाल्यामुळे मागील ८ दिवसांपासून नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु सर्व प्रयत्न करूनही डॉक्टरांची चमू तिचा जीव वाचवू शकली नाही. गुरूवारी (दि.२६) सायंकाळी रेव्यानीला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. रेव्यानीची आई आरती रहांगडाले व वडील राधेश्याम रहांगडाले यांनी रेव्यानीचे अवयव दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्या अंतर्गत तिचे हृदय मुंबईच्या दोन वर्षाच्या बालिकेला देण्यात आले. तर किडणी, डोळे, लिव्हर आणि लंग्स इतर चार बालकांना देण्यात आले. विविध शहरातून आलेल्या डॉक्टरांच्या चमूने ही अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली. रेव्यानीच्या कुटुंबीयांनी वेळीच निर्णय घेतल्याने पाच बालकांना नवजीवन मिळाले. रेव्यानीचे आई-वडील गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील भजेपार येथील रहिवासी आहेत. सध्या ते देवरीच्या पोलीस विभागात कार्यरत आहेत. रेव्यानीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे. तिची आई आरती रहांगडालेसुद्धा लहानपणापासूनच सामाजिक कार्याशी जुडलेली आहे.
‘रेव्यानी’ ने दिले पाच बालकांना नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:43 IST
देवरी जवळ झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी वेळीच घेतला. त्यामुळे पाच बालकांना नवजीवन मिळणार आहे.
‘रेव्यानी’ ने दिले पाच बालकांना नवजीवन
ठळक मुद्देअपघातात जखमी : सहा वर्षीय बालिकेला डॉक्टरांनी केले होते ब्रेनडेड घोषित