शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कराचे फेरमूल्यांकन सुरू होणार

By admin | Updated: February 22, 2016 01:50 IST

शहरातील मालमत्तांच्या फेर कर मूल्यांकनाच्या कामाला आता पुन्हा लवकरच सुरूवात होणार आहे.

कपील केकत गोंदियाशहरातील मालमत्तांच्या फेर कर मूल्यांकनाच्या कामाला आता पुन्हा लवकरच सुरूवात होणार आहे. कारण या कामाला घेऊन नगर परिषदेच्या विशेष आमसभेत आवश्यक ती चर्चा झाली असून काम करणाऱ्या कंपनीला नवे दर देण्यास मंजूरी मिळाली आहे. यासाठी अध्यक्षांनी तीन सदस्यांची समिती गठित केली असल्याची माहिती असून प्रती मालमत्ता दर निश्चित होताच या कामाला सुरूवात होणार असल्याचे दिसून येत आहे. शहरात असलेल्या मालमत्तांकडून कर स्वरूपात येणारी रक्कम हीच नगर परिषदेची मुख्य आवक आहे. शिवाय यावरच शासनाकडून मिळणारे अनुदानही ठरविले जाते. अशात नगर परिषदेच्या हद्दीतील मालमत्तांचे कर मुल्यांकन करणे गरजेचे असते. मात्र शहरातील सुमारे ४० टक्केच्या घरात मालमत्तांचे कर मुल्यांकन झालेले नसल्याची माहिती आहे. अशात या मालमत्तांकडून कर मिळत नसल्याने याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. याकरिता शहरातील मालमत्तांचे फेर कर मुल्यांकन करण्याचे काम नगर परिषदेने सुरू करविले होते. शहरातील मालमत्तांचे फेर कर मुल्यांकन व्हावे यासाठी नगर परिषदेकडून २४ डिसेंबर २०१० रोजी अमरावतीच्या स्थापत्य कन्सलटन्स प्रा.ली. या एजंसीला काम देण्यात आले होते. त्यावेळी प्रती मालमत्ता २७४ रूपये या दराने एजंसी सोबत करार झाला होता. तेव्हा एजंसीने शहरातील १४ वॉर्डांचे प्राथमिक सर्वेक्षण केले होते. तर करारनाम्या प्रमाणे काही प्रमाणात पेमेंट करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र आर्थिक तरतूदी अभावी नगर परिषदेने एसंजीला पैसे न दिल्याने एजंसीने काम बंद केले होते. दरम्यान २८ सप्टेंबर २०१५ रोजी नगर परिषदेने एजंसीला २३ लाख ७४ हजार ४४७ रूपयांचे पेमेंट केले. यावर एजंसीने १४ वॉर्डांचे पूर्वी केलेले प्राथमिक सर्वेक्षण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण केले. मात्र फेर कर मुल्यांकनाच्या कामाचा कार्यादेश सन २०१० चा असून तेव्हा करार करण्यात आलेल्या २७४ रूपयांच्या दराने पुढील काम त्याच दरात आता करणे आर्थिक दृष्टया शक्य नसल्याचे एजंसीकडून कळविण्यात आले. तसेच यासाठी नगर परिषदेने नव्या दराने काम मंजूर करून पुढील काम करण्यास आदेश द्यावा असे पत्र एजंसीकडून २१ जानेवारी रोजी नगर परिषदेला पाठविले. या पत्रासह एजंसीने दोन महानगर पालिका व चार नगर परिषदांच्या कंत्राटाचे दर वर्ष निहाय पुराव्यासह नमूद करून पाठविले. त्यात नगर परिषद उस्मानाबाद (अ-वर्ग) चा सन २०१५ चा ४९५ रूपये व प्रत्यक्ष दर ४९२ रूपयांचा करार निश्चीत असल्याचा मुख्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा पुरावा एजंसीकडून जोडण्यात आला आहे. यावर नगर परिषदेने शनिवारी (दि.२०) घेतलेल्या विशेष आमसभेत हा विषय मांडून त्यावर चर्चा केली. यामध्ये फेर कर मुल्यांकनाचे काम करावयाचे असल्याने नवे दर देण्यास मंजूरी दर्शविण्यात आली असून उस्मानाबाद नगर परिषदेच्या प्रती मालमत्ता दरादरम्यानचे दर निश्चीत करणे योग्य राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नगर परिषदेने एकदा दर निश्चीत केल्यानंतर तसा कार्यादेश एजंसीला देण्यात येणार व फेर कर मुल्यांकनाचे काम पुन्हा शुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. यातून नगर परिषदेची आवक वाढून शहरातील विकासकामे होणार. नागरी सुविधा केंद्र व विद्युत विभागावर चर्चा विशेष आमसभेत फेर कर मुल्यांकनाच्या विषयासह नागरी सुविधा केंद्र तसेच विद्युत विभागातील विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरी सुविधा केंद्रांतर्गत फेयरवेल वीथ एसएसएल सर्टिफि केट खरेदीसाठी येणाऱ्या खर्चाला १३ व्या वित्त आयोगातून पेमेंट करण्याचा विषय घेण्यात आला. तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत पेमेंट गेटवेची सेवा सुरू करण्याकरिता खाते उघडण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याशिवाय टाऊन शाळेवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सातारा येथील ओम एंटरप्राईजेस यांना दिलेला कार्यादेश रद्द करून पुन्हा निविदा टाकण्याचा विषय घेण्यात आला. तर नगर परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या पथदिव्यांचे विद्युत देयक १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.