लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सिरपुरबांध येथील महाराष्ट्र राज्य सीमा तपासणी नाकाला शासनाकडून आर्थिक वर्ष २०१९-२० करिता ९१ लाख रुपये महसुलीचे लक्षांक देण्यात आले होते. परंतु सुरु असलेल्या या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०१९ अखेर एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल गोळा करुन शासनाने दिलेले उद्दिष्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले आहे.सविस्तर असे की, जवळील ग्राम सिरपुरबांध येथील सीमा तपासणी नाका येथे अधिकारी स्वत:चे हित जोपासून काम करतात याबाबतची ओरड असते. परंतु सुरु असलेल्या २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने या तपासणी नाकाला ९१ लाख रुपयांचे महसूल गोळा करण्याचे लक्षांक दिले होते.हा लक्षांक गाठण्याकरिता येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस एक निष्ठेने काम करुन नोव्हेंबर २००९ अखेरपर्यंत शासनाने दिलेले ९१ लाख रुपयांचे लक्षांक पूर्ण करुन अधिकचे १७ लाख म्हणजे एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल गोळा करुन शासनाला मदत केली आहे.या सीमा तपासणी नाकावर नागपूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक जमदाडे व सोनोने यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत शासनाने दिलेले लक्षांक गाठून अधिकचा महसूल गोळा करुन देण्यात सहकार्य केले.
सीमा तपासणी नाक्याने गाठला महसूल लक्षांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST
हा लक्षांक गाठण्याकरिता येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस एक निष्ठेने काम करुन नोव्हेंबर २००९ अखेरपर्यंत शासनाने दिलेले ९१ लाख रुपयांचे लक्षांक पूर्ण करुन अधिकचे १७ लाख म्हणजे एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल गोळा करुन शासनाला मदत केली आहे.
सीमा तपासणी नाक्याने गाठला महसूल लक्षांक
ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांच्या मार्गदर्शनात महसुलीचे उद्दिष्टे पूर्ण