शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

त्या मोटारसायकल चोरट्यांकडून चोरीचे पाच गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे ...

गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. पोलिसांनी या मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना २० मार्च रोजी चुलोद परिसरातून आराेपी सचिन ऊर्फ सोनू ठाकूर व आनंद राहांगडाले या दोघांना अटक केली. त्यांच्या जवळून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे त्या आरोपींनी तीन गुन्ह्यांची माहिती उघडकीस आली होती. त्या गुन्ह्याच्या पोलीस कोठडीत तपास करताना त्या आरोपींनी गोंदिया शहर पोलिसांना आणखी दोन चोरीची माहिती दिली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी त्या दोन गुन्ह्यातील दोन्ही मोटारसायकल जप्त केल्या आहेत. २५ मार्चपर्यंत त्या आरोपींची पोलीस कोठडी वाढली आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्या दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, अभिजित भुजबळ, जागेश्वर उईके, छगन विठ्ठले, सुबोध बिसेन, योगेश बिसेन व इतरांनी केली आहे.