शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘रियूज कुकिंग ऑईल’, 200 हॉटेल्सवर राहणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोर जावे लागू शकते. हे होऊ नये यासाठी गोंदियाच्या अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देअन्न सुरक्षा विभागाची तपासणी मोहीम : २५ पोलार युनिटच्या आतच वापरावे तेल

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण हॉटेल चालक असाल तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपला व्यवसाय करताना ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या २०० हॉटेलांत पदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेल चालकांवर आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे.  हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोर जावे लागू शकते. हे होऊ नये यासाठी गोंदियाच्या अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. ‘रियूज कुकिंग ऑइल’ वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

मे. शालिमार हॉटेलची तपासणी- अन्न व सुरक्षा विभागाने गोंदियातील हॉटेलांमधील ‘रियूज कुकिंग ऑइल’ तपासणी केली. गोंदियाच्या कुडवा येथील मे. शालीमार हॉटेलातील वापरण्यात येणाऱ्या तेलाची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी भास्कर नंदनवार, पीयूष मानवतकर,  शीतल देशपांडे  यांनी तपासणी केली. समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यांसाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये, तेलाचा पोलार युनिट २५ पर्यंतच वापरण्याचे परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरल्या गेले तर त्या हॉटेल चालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. शालीमार हॉटेलातून घेतलेल्या तेलाचे नमुन्यांचा पोलार युनिट १०.५ असल्याने हे तेल वापरण्यायोग्य होते. 

 

टॅग्स :hotelहॉटेल