लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यांची अद्यापही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसांनी होणाºया गणेश विसर्जनाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी खड्डेमय रस्त्यावरुनच गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास होणार असल्याचे चित्र आमगाव शहरात आहे.आमगाव नगर परिषदेतंर्गत रस्ते व राज्य मार्ग रस्ते प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे आमगाव येथील रस्त्यांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रिसामा ते लांजी मार्ग, गांधी चौक ते तुकडोजी चौक, आदर्श विद्यालय मार्ग, आंबेडकर चौक, गोंदिया मार्ग, देवरी मार्ग, विजयालक्ष्मी सभागृह मार्ग, कुंभारटोली, बिरसी मार्ग, नटराज मार्ग या रस्त्यांची बांधकाम झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच दुर्दशा झाली. रस्त्यांवरील खड्डयांमुळे वांरवार अपघात घडत आहे. मात्र यानंतरही हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात येत नसल्याचे आश्चर्य आहे. आमगाव नगर परिषद व राज्य मार्ग या रस्त्यांची बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे. यात अनेक सिमेंट रस्ते व डांबरी रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाने २०१६-१७ या कालावधी तयार केले. संबंधित विभागाच्या कामचुकार धोरण व कमिशनखोरीमुळे रस्त्यांची सहा महिन्यातच वाट लागली आहे. आमगाव शहरातील मुख्य मार्ग व आतील रस्त्यांवर खड्डे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांना गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पायी चालणाºया नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांची दुरूस्ती करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली. पण त्याचा कसालाही उपयोग झाला नाही. परिणामी नागरिकांचा त्रास कायम आहे.त्यामुळे गणरायाचा परतीचा प्रवास देखील खड्डयामधूनच होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमगाववासीयांनी आता गणरायाला साकडे घालून प्रशासनाला रस्ते दुरूस्ती करण्याची सद्बुध्दी देण्यासाठी मागणे घातले आहे.अधिकाºयांना प्रशासनाचे अभयरस्ते बांधकामाच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोळ केला जात आहे. त्यासंबंधी वास्तविक स्थिती देखील प्रशासनासमोर येत आहे. तर नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. पण, यानंतरही प्रशासनाने याची चौकशी करुन कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाºयावर कारवाई केल्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना प्रशासनाचे अभय मिळत असल्याचे चित्र आहे.सहा महिन्यातच रस्त्याची दुर्दशाआमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील रिसामा कुंभारटोली मार्ग हा विरसी पर्यंत जातो. या मार्गावरील वळणावर सिमेंट कांक्रीटचे बांधकाम जिल्हा परिषद अंतर्गत ३०५४ या लेखाशिर्षातंर्गत केले. त्यावर २ लाख ९६ हजार ७६६ रुपये खर्च करण्यात आला. पण अवघ्या सहा महिन्यातच हा मार्ग उखडल्याचे चित्र आहे.
खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:17 IST
शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यांची अद्यापही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसांनी होणाºया गणेश विसर्जनाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
खड्डेमय रस्त्यावरुन गणपती बाप्पांचा परतीचा प्रवास
ठळक मुद्देरस्त्यांच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये संताप