शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रोजेक्टर भेट देऊन शैक्षणिक उपकाराची परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 00:34 IST

ज्या शाळेने आपल्याला घडवले, चांगले शिक्षण व संस्कार दिले त्या शाळेच्या उपकाराची परतफेड करणे तर कोणालाच शक्य नसते,

माजी विद्यार्थ्याचे दातृत्व : उपायुक्त वंजारी यांचा डिजिटल शाळेसाठी पुढाकार खातिया : ज्या शाळेने आपल्याला घडवले, चांगले शिक्षण व संस्कार दिले त्या शाळेच्या उपकाराची परतफेड करणे तर कोणालाच शक्य नसते, पण शक्य ती मदत करून त्यातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्याचा प्रयत्न बिरसी जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या विक्रीकर उपायुक्त असलेले धनंजय वंजारी यांनी केला आहे. वंजारी यांनी बिरसी जिल्हा परिषद शाळेत १९८३ मध्ये दाखल होऊन शिक्षण सुरू केले होते. पुढे ते उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) दाखल झाले. सध्या ते विक्रीकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. इतर शाळांप्रमाणे आपलीही शाळा डिजीटल झाली पाहीजे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या वतीने मदत म्हणून शाळेसाठी प्रोजेक्टर भेट देण्याचे ठरविले होते. कामठा केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळा जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी त्यांनी पाठविलेले प्रोजेक्टर स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रविंद्र तावाडे तर उद्घाटन सेवा सोसायटी ग्राम बिरसी अध्यक्ष रामप्रसादसिंह पंडेले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मिरा तावाडे, रुपसिंह बाट, पोलीस पाटील महेश सहारे, उपसरपंच मुन्ना मेश्राम, माजी सरपंच गणेशसिंह मुन्डेले, संतोष वंजारी, नारायण वंजारी, भैयासिंह कोहरे, नरेंद्र बोरकर, नत्थु शेंडे आणि अनेक प्रमुख नागरी उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या रंगारंग प्रस्तुतीने सर्व गावकऱ्यांची मने जिंकून घेतली. यावेळी वंजारी यांनी पाठविलेले प्रोजेक्टर रोशन मेश्राम, नारायण वंजारी, भीमराज वंजारी, हितेश वंजारी, अनमोल मेश्राम, कपील श्यामकुवर आदीच्या हस्ते शाळेला देण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका एस.पी.मेश्राम, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय मंत्रीमंडळ, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी सहकार्य केले. संचालन बी.आर.मेश्राम यांनी केले तर आभार एस.डी.सोलंकी यांनी मानले. (वार्ताहर) सुविधांचा लाभ घेऊन प्रगती करा- वंजारी यासंदर्भात उपायुक्त वंजारी यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळी शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी आम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागले, पण आजच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये समोर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे आता शिक्षण घेणे सोईस्कर होत आहे. पण मोठ्या पदावर जाण्यासाठी फार कठीण परिश्रम घेणे आवश्यक आहे. डिजीटल शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.