शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महामंड‌ळासोबत निवृत्तीनंतरचा हिशेब झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : रस्ते प्रवासासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांनाही प्रवासाप्रमाणेच कामावर व त्यानंतरही सुरक्षितता दिल्याचे ...

गोंदिया : रस्ते प्रवासासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांनाही प्रवासाप्रमाणेच कामावर व त्यानंतरही सुरक्षितता दिल्याचे दिसून येत आहे. येथील आगारातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या म्हातारपणाचा पैसा लगेच देण्यात आला आहे. कित्येक अन्य विभागांमध्ये कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्यांच्या म्हातारपणासाठी जमा केलेल्या पीएफ व ग्रॅच्युईटीच्या पैशांसाठी फरफट करावी लागते. मात्र आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लगेच त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पैसे देण्यात आल्याचे कळले. यावरून प्रवाशांना प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी देणारे राज्य रस्ते परिवहन महामंडळ तेवढीच सुरक्षितता आपल्या कर्मचाऱ्यांना देत असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------

जिल्ह्यात एकूण आगार - २

अधिकारी - ६

कर्मचारी - १२२

बसचालक - १९७

वाहक - १५१

---------------------------

लगेच मिळाले पैसे

मे महिन्यात माझी सेवानिवृत्ती झाली असून मला पीएफ व ग्रॅच्युईटीचे पैसे मिळाले आहेत. आता फक्त सुट्ट्यांचा हिशेब उरला असून अन्य सर्व पैसे मिळाले आहेत. विभागात केल्यानंतर त्यांच्याकडूनही लगेच पैसे देऊन कर्मचाऱ्यांची सुविधा करण्यात आली आहे.

- नैनसिंह कुसराम

-------------------

आगारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हातारपणासाठी असलेले पीएफ व ग्रॅच्युईटीचे पैसे मिळाले आहेत. विभागाकडून आमचा हिशेब करण्यात आला आहे. त्यामुळे पैशांसाठी फरफट करावी लागली नाही. विभागात काम केले त्याचा मोबदला तसाच लवकर देण्यात आला.

- इब्राहिम शेख

---------------------------------

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न कायम आहे. तर काहींच्या सुट्ट्यांचा हिशेब अद्याप झालेला नाही. पेन्शनचा प्रश्न लवकर सोडवून दिल्यास त्या कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार.

- सईद शेख (अध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना)

-----------------------------

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा हिशेब विभागाकडून त्वरित केला जातो. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे असल्याने ते अडवून ठेवण्याचा प्रश्नच नाही. शिवाय याबाबत आतापर्यंत एकही तक्रार आली नाही. यामुळे सर्वांचा हिशेब झाल्याचे दिसत आहे.

- पंकज दांडगे (आगारप्रमुख, तिरोडा)