शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:33 IST

वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.

ठळक मुद्देवाढीव पेन्शन मिळणे दूरच : वन विकास महामंडळाचा अजब कारभार, कर्मचाऱ्यांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची फरफट कायम आहे.वनविकास महामंडळातून वनक्षेत्रपाल म्हणून सेवानिवृत्त झालेले डी.बी.भावे यांना मागील दोन महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही. संबंधित विभागाचे अधिकारी लवकरच पेन्शन मिळेल असे आश्वासन देतात. मात्र अद्यापही त्यांना पेन्शन मिळाली नाही.सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ही या कर्मचाऱ्यांचा आधार असतो.यातूनच त्यांना महिनाभराचा कुटुंब आणि औषध पाण्याचा खर्च करावा लागतो.शिवाय जास्त धडपड करणे सुध्दा त्यांना जमत नाही.मात्र संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे त्यांना पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्यात आली. यासाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे भरण्यास सांगण्यात आले.त्यानुसार भावे यांनी १ लाख २० हजार ८७६ रुपयांची वाढीव रक्कम देखील भरली. याला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही त्यांना वाढीव पेन्शन मिळाली नाही.त्यामुळे त्यांच्या जवळची जमापुंजी सुध्दा आता शिल्लक राहिली नाही. पेन्शन मिळण्यास तीन तीन महिने उशीर होत असल्याने भावे यांच्याप्रमाणेच इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेच्या आणि संबंधित विभागाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची नागपूर येथील पेन्शन आयुक्तांनी दखल घेवून सेवानिवृत्त कर्मचाºयांची समस्या दूर करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग