शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:27 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देतिरोड्यात चांगला तर गोंदियात अल्प प्रतिसाद : कर्मचारी मागण्यांवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तिरोडा आगारातून दिवसभरात केवळ तीन बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली पगारवाढ मान्य नसल्यामुळे गुरूवारपासून राज्यभरातील एस. टी. कर्मचारी संपावर गेले आहे. या संपाचा परिणाम शनिवारी गोंदिया व तिरोडा आगारात जाणविला. गोंदिया आगारात एकूण ९१ बसेस असून यापैकी ८६ बसेसच्या सुरळीत सुरू होत्या. या संपात आगारातील १९ चालक व २७ वाहक सहभागी झाले होते. त्यामुळे याचा ३२ टक्के बस फेºयांवर परिणाम झाल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.तिरोडा आगारातून शनिवारी दिवसभरात केवळ तीन बसेस सोडण्यात आल्या. उर्वरित ४२ बसेस आगारात उभ्या होत्या. ७० चालक, ६५ वाहक व २० इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही बसफेऱ्या न झाल्याने आगाराला तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसला. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गांना ये-जा करण्यास बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी जाता आले नाही. इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना काळी पिवळी वाहनाचा आधार घ्यावा लागला. या संपात सहभागी झालेले कर्मचारी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप