शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

वनपर्यटनावर होणार परिणाम

By admin | Updated: October 13, 2016 01:43 IST

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या घडीला एकही वाघ नाही. त्यामुळे वनपर्यटक ज्या वाघाच्या दर्शनासाठी उत्साहाने येतात त्यांची निराशा होत आहे.

आॅनलाईन बुकिंग सुरू : व्याघ्र प्रकल्पात वाघाचेच दर्शन दुर्लभगोंदिया : नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या घडीला एकही वाघ नाही. त्यामुळे वनपर्यटक ज्या वाघाच्या दर्शनासाठी उत्साहाने येतात त्यांची निराशा होत आहे. यातून येथील वनपर्यटन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘जय’सारखा आकर्षक वाघ गायब झाल्यानंतर तर वाघांनीही वाघिणीच्या शोधात येथून काढता पाय घेतला आहे. मात्र वन्यजीव विभाग या जंगलात वाघांचे पुनरागमन होण्यासाठी आशादायी आहे.महसूल व वन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १२ डिसेंबर २०१३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. १ आॅक्टोबर ते १५ जूनपर्यंत हे वनक्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यात येते. यात नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य व कोका अभयारण्याचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून येथे पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांची संख्यासुद्धा वाढू लागली व वन-वन्यजीव विभागाला पैशाचीही आवक होत आहे. यावर्षीही १ आॅक्टोबरपासून राबविण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहानंतर हे क्षेत्र वनपर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे.गोंदिया वन्यजीव विभागाची निर्मिती पूर्वीच्या वन्यजीव विभाग भंडारा व नागपूरमधून सन १९९६ मध्ये झाली. गोंदियात सन १९९९ पासून कार्यालय कार्यरत झाले. या विभागाची श्रेणीवाढ होवून सन ११ नोव्हेंबर २०११ पासून वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी येथे कार्यरत आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आॅनलाईन बुकिंग सध्या सुरू आहे. आॅफलाईन बुकिंग १६ आॅक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) एस.एस. कातुरे यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार, सध्या पाऊस आल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील रस्ते योग्य नाहीत. त्यामुळे वाहन तेथे जात नाहीत. मात्र दोन-तीन दिवसांत वाहन जावू शकतील, अशी रस्त्यांची स्थिती होईल. (प्रतिनिधी)- तंबू निवासातून रोजगाराच्या संधी