शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ पूर्ववत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:28 IST

‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ असूनही अनुसूचित जाती, जमातींवरील अत्याचार कमी झाले नाही. त्यातच हा कायदा निष्प्रभ केल्यास अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारात वाढ होईल.

ठळक मुद्देअनुसूचित जाती-जमातीची मागणी : तिरोड्यात बाईक रॅली, एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ असूनही अनुसूचित जाती, जमातींवरील अत्याचार कमी झाले नाही. त्यातच हा कायदा निष्प्रभ केल्यास अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचारात वाढ होईल. त्यामुळे अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट पूर्ववत ठेवण्याची एकमुखी मागणी तिरोडा तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या प्रतिनिधी मंडळातर्फे करण्यात आली.सोमवारी (दि.२) दुपारी १२ वाजता अनुसूचित जाती-जमातीच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाप्रज्ञा बुद्ध विहार प्रबंधन समिती अंतर्गत काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार भजनदास वैद्य, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, नगरसेवक राजेश गुणेरिया, नगरसेवक विजय बन्सोड, जंगल कामगार संघटनेचे अध्यक्ष जगन धुर्वे यांनी केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, प्रीती रामटेके, सुनिता मडावी, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे सचिव के.के. वैद्य, कोषाध्यक्ष रत्नाकर नंदागवळी, वंदना चव्हाण, पंचशीला रामटेके, अजय वैद्य, प्रवीण शेंडे, पवन वासनिक, शामराव भोंडेकर, मुकेश बरियेकर, पंकज तिरपुडे, प्रदीप रंगारी, तिर्थराज बागडे, डॉ. कैलाश शेंडे, दर्शन तिरपुडे, निलेश रोंडगे, आनंद मेश्राम, किरण मेश्राम, गुणवंत बन्सोड, यांच्यासह अनुसूचित जाती-जमातीचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातून बाईक रॅलीला सुरूवात करण्यात आली. या वेळी ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट लागू करो’च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपस्थित समाजबांधवांनी मार्गदर्शन करून शासनाचा निषेध व्यक्त केला.२० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ ची व्याख्या करून या कायद्यातील सामाजिक सुरक्षा जवळपास समाप्त केली. त्यामुळे जातीय वर्चस्वात वाढ होवून देशाची वाटचाल फुटीरतेकडे होणार असल्याची भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या समर्थनार्थ प्रभावी बाजू मांडली नसल्याने न्यायालयाचा हा निर्णय आला. भक्षकाला रक्षक बनविण्याची तरतूद या निर्णयात आहे. ज्यामुळे शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी.त्यात शासनाच्या वकिलांसह अनुसूचित जाती-जमातींच्या वकिलांचादेखील समावेश करावा, अशी मागणीसुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदार संजय रामटेके यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने निवेदन स्वीकारले. आंदोलनात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते.