शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

आमदारांच्या जनता दरबारात समस्यांचे निराकरण

By admin | Updated: June 1, 2017 01:09 IST

गोंदिया जिल्ह्यातील गावांच्या शेत भेटीतून आ. परिणय फुके यांनी शेत शिवाराची पाहणी स्थानिक जनतेशी संवाद साधला.

बोगस सातबाऱ्यावर धान खरेदी : वाचला समस्याचा पाढा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गावांच्या शेत भेटीतून आ. परिणय फुके यांनी शेत शिवाराची पाहणी स्थानिक जनतेशी संवाद साधला. दरम्यान नागरिकांच्या समस्या आहेत. त्या ऐकून तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन २८ मे ला करण्यात आले होते. जनता दरबारात जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामीण भागातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून प्रशासनात कारभार चव्हाट्यावर आणला. यावर आ. परिणय फुके यांनी याबाबीची तत्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी समस्यांनी त्वरीत सोडवणूक करावी, असे निर्देश दिले. शासकीय धान खरेदीत बोगस सातबारा तयार करून धान खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, दासगाव इरिगेशन अंतर्गत येणाऱ्या घिवारी येथील पाणी टंचाईची समस्या तसेच धानपिकाला दहा वेळा पाणी देण्यात येणार होते. परंतु ८ वेळा पाणी देण्यात आल्याने गोंदिया तालुक्यातील १२०१ हेक्टर वरील धानपिक धोक्यात आले आहेत. सतोना येथे सन २००४-०५ मध्ये आलेल्या पुरामुळे येथील नागरिकांकरीता ८ कोटींच्या निधीतून पुनर्वसनाकरीता इमारत तयार करण्यात आली. परंतु इमारतीची दुरवस्था असल्याने नागरिक तेथे जाण्यास टाळले. त्यामुळे या इमारतींचे दुरुस्ती करून येथे पुरबाधित नागरिकांचे पुर्नवसन करण्यात यावे, बनाथर येथील आरोग्य उपकेंद्राना प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपांतरीत करण्यात यावे, दासगाव जलयुक्त शिवाराचे काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. गोंदिया तालुक्यात अधिकाधिक संख्येत मग्रारोहयोची कामे सुरु करण्यात यावी. जेणेकरून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार, काटी-तेढवाच्या नवीन पुलाचे निर्माण झाले. मात्र जुना पूल तोडण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. करीता सदर जूना पूल त्वरीत तोडण्यात यावा, मुद्रा लोणमध्ये शहरी क्षेत्रातील नागरिकानाच वाटण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बँकाना मुद्रा लोण वाटप करावे, असे आदी विविध प्रश्न नागरिकांना जनता दरबारात आ. परिणय फुके, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुखांसमोर उपस्थित केले. यावर आ. परिणय फुके यांनी संबंधित विभाग प्रमुखांना नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडविण्यासाठी निर्देश दिले. मुद्रा लोनसाठी संबंधित बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन ग्रामीण जनतेला या योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आ. परिणय फुके यांच्यासह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प.सभापती छाया दसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.